Join us

स्टार्टर्सचा राजा म्हणजे चना कोलिवाडा.. पाहा झणझणीत रेसिपी, विकतच्याची चवच विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 08:25 IST

The king of starters is Chana Koliwada.. Check out the spicy recipe : पाहा झणझणीत रेसिपी. चना कोलिवाडा तयार करण्याची सोपी पद्धत.

आपल्याला अधून मधून काहीतरी चमचमीत खायची लहर येते. (The king of starters is Chana Koliwada.. Check out the spicy recipe)पण नेहमी काय वेगळं खाणार? असाही प्रश्न पडतो. आपण बरेचदा एखाद्या छानशा  हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिथे गेलं की अनेक प्रकारचे स्टार्टर्स मेन्यूमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये एक पदार्थ असोतच. ज्याचे नाव आहे, चना कोलीवाडा. हा पदार्थ चवीला फारच मस्त लागतो. नावावरून कळून येते की, किती चमचमीत असा पदार्थ आहे ते. (The king of starters is Chana Koliwada.. Check out the spicy recipe)तो  खाताना आपल्याला आसे वाटते की, ते घरी तयार करणे फारच कठीण असेल. पण तसे काही नाही चना कोलीवाडा तयार करायला फारच सोपा पदार्थ आहे. आणि झटपटही तयार होतो. फक्त योग्य अशी रेसिपी जाणून घ्या.

साहित्यकाबूली चणे, मीठ, पाणी, आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, तांदळाचं पीठ, लिंबू,  तेल, बेसन, हळद, जिरे पूड

कृती१. रात्रभर काबुली चणे भिजत घालायचे. ते व्यवस्थित भिजल्यावरच ते छान फुलतात. तयार करण्याआधी पाण्यातून काढून घ्यायचे. स्वच्छ करून घ्यायचे.

२. कुकरमध्ये चणे मस्त शिजवून घ्यायचे. चांगल्या तीन तरी शिट्या काढून घ्या. चणे छान मऊ झाले पाहिजेत. 

३. कुकर उघडला की चण्यातील पाणी काढून टाका. ते कोरडे करून घ्या. नंतर एका वाडग्यामध्ये तेल घ्या. त्यामध्ये लाल तिखट घाला. हळद घाला. जिरे पूड घाला. सगळं छान मिक्स करून घ्या. 

४. आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची छान पेस्ट तयार करून घ्या. ती ही तयार मिश्रणात घाला.

५. आता त्या मिश्रणामध्ये बेसनाचं पीठ घाला. थोडं तांदळाचं पीठ घाला. तांदळाच्या पीठामुळे कुरकुरीतपणा येतो. ते सगळं छान मिक्स करून घ्या. गुठळ्या पडू नयेत म्हणून पाणी घाला. पण अगदी थोडंच पाणी वापरा. 

६. त्या मिश्रणामध्ये उकडलेले चणे टाका आणि मग ते नीट एकजीव करून घ्या. नंतर थोडावेळ मॅरीनेट करा. 

७. गरम तेलामधून तळून घ्या. हे चणे कुरकुरीत व्हायला जास्त वेळ लागतो. चण्यांबरोबरच लसुणही तळा. तळून झाल्यावर त्यामध्ये चाट मसाला टाका. मीठ टाका. छान मिक्स करा.

टॅग्स :अन्नपाककृतीमहाराष्ट्र