विजयादशमी म्हणजेच दसरा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभदिनी घराघरात आनंदी आणि उत्साही वातावरण असते. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्यासोबतच गोडाधोडाच्या जेवणाचा खास बेत घरोघरी केला जातोच. या सणाला महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळे गोडाचे पदार्थ तयार केले जातात. खास दसऱ्याला (Tandalachi kheer Recipe) आपण इतर गोड पदार्थांबरोबरच, पारंपरिक तांदुळाची खीर देखील करु शकतो(Easy rice kheer recipe).
बरेचदा अनेक गृहिणींची तक्रार असते की, तांदुळाची खीर केली की पातळ, पाणचट होते किंवा त्यात खिरीचा स्वाद येतच नाही. यासाठी, तांदुळाची खीर ही रबडी, बासुंदी सारखीच घट्ट व दाटसर होण्यासाठी आपण नेहमीपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने तांदुळाची खीर तयार करु शकतो. दूध, बासमती तांदूळ आणि साजूक तुपाचा खमंग सुगंध यामुळे या खिरीला अप्रतिम अशी चव येते. साधा - सोपा वाटणारा हा पदार्थ खीर, दूध, तांदूळ, साखर आणि सुकामेवा यांच्या योग्य मिश्रणाने एक शाही पदार्थ तयार होतो. तांदुळाची साधी खीर रबडी, बासुंदीप्रमाणेच घट्ट व दाटसर होण्यासाठी खास रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. मोगरा बासमती तांदूळ - २ ते ३ टेबलस्पून२. पाणी - गरजेनुसार३. काजू - ४ ते ५ ४. केसर - ५ ते ६ काड्या५. दूध - १ कप ६. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ७. मीठ - चिमूटभर८. दूध - १ लिटर९. साखर - चवीनुसार१०. वेलची पूड - १/२ टेबलस्पून११. ड्रायफ्रूट्स काप - ३ ते ४ टेबलस्पून
तेलाचा थेंबही न वापरता करा परफेक्ट कुरकुरीत डोसा ! उडप्याचे खास सिक्रेट - सुपर क्रिस्पी डोसा तयार...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये मोगरा बासमती तांदूळ घेऊन ते पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. मग याच बाऊलमध्ये काजू आणि थोडे पाणी घालून काजू व तांदूळ एकत्रित अर्ध्या तासांसाठी भिजवून घ्यावे. २. एका बाऊलमध्ये थोडे गरम दूध घेऊन त्यात केशर काड्या घालून मिश्रण तयार करून घ्यावे. ३. एका मिक्सरच्या भांडयात पाण्यात भिजवलेले तांदूळ व काजू आणि थोडे दूध घालूंन एकत्रित मिश्रण वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ४. कढईत थोडे साजूक तूप घेऊन त्यात पाण्यांत भिजवलेल्या तांदुळापैकी थोडे तांदूळ घालावेत. यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालून वर झाकण ठेवून नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यावा. भात शिजल्यानंतर तो चमच्याच्या मदतीने हलकेच दाब देत त्याचा लगदा तयार करून घ्यावा.
५. आता या भात शिजवून लगदा केलेल्या मिश्रणात दूध ओतावे. मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. आता यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तांदूळ, काजूची पेस्ट, केसर घातलेले दूध घालून मंद आचेवर १० मिनिटे खीर शिजवून घ्यावी. मग यात चवीनुसार साखर घालावी. ६. एका दुसऱ्या भांड्यात थोडी साखर घेऊन ती मंद आचेवर वितळवून त्याचे कॅरॅमल तयार करून घ्यावे. हे तयार कॅरॅमल खिरीत घालावे. थोडे साजूक तूप घेऊन त्यात ड्रायफ्रुट्स हलकेच तळून खिरीत घालावे. सगळ्यात शेवटी थोडी वेलची पूड घालावी.
रबडी, बासुंदीसारखीच घट्ट व दाटसर तांदुळाची खीर खाण्यासाठी तयार आहे. खीर सर्व्ह करताना त्यावर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटसचे काप भुरभुरवून घालावे.
Web Summary : Celebrate Dasara with traditional, thick rice kheer! This easy recipe guarantees a rich, flavorful dessert, avoiding common pitfalls like a watery consistency. Enjoy a delightful, creamy treat with simple ingredients.
Web Summary : दशहरा पर बनाएं पारंपरिक गाढ़ी चावल की खीर! यह आसान रेसिपी स्वादिष्ट मिठाई की गारंटी है, जो पानी जैसी स्थिरता से बचाती है। सरल सामग्री के साथ एक आनंददायक, मलाईदार व्यंजन का आनंद लें।