Join us

उपवासाला हवेच रताळ्याचे गोड काप, अगदी पारंपरिक चव आणि पोटभरीचे चविष्ट खाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2025 12:56 IST

Sweet slices of sweet potato are a must-have during fasting, with a very traditional taste and filling taste : उपवासाला काही गोड खायचे असेल तर ही रेसिपी अगदी मस्त आहे.

गोड पदार्थ म्हटल्यावर आपल्याला लगेच वेळेचे गणित मांडावे लागते. सामानाची यादी काढावी लागते. (Sweet slices of sweet potato are a must-have during fasting, with a very traditional taste and filling taste.)कारण छान गोड पदार्थ करायला फार वेळही लागतो आणि सामानही बरेच लागते. आणखी एक मुख्य मुद्दा जो सहसा आपण बोलतही नाही तो म्हणजे गोड काही करायचे म्हणजे खर्चिक असते. त्यापेक्षा पाव किलो काही तरी विकत आणायचे किंवा साधा शीरा, खीर घरी करायचे असे पर्याय आपण शोधतो. मात्र असे अनेक पदार्थ असतात जे करायला फारच सोपे असतात आणि अगदी कमी सामग्रीत करता येतात. जसे की हे रताळ्याचे गोड काप. उपासालाही खाता येईल असा मस्त चविष्ट पदार्थ. पाहा झटपट रेसिपी.     

साहित्यरताळे  तूप, पीठी

कृती१. छान ताजी रताळी घ्यायची. सोलायची गरज नाही फक्त स्वच्छ धुवायची. रताळ्यांवर भरपूर माती असते त्यामुळे ती पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवायची.(Sweet slices of sweet potato are a must-have during fasting, with a very traditional taste and filling taste.) मग हाताने चोळून व्यवस्थित साफ करायची. मग त्याची दोन्ही टोकं कापून घ्यायची. रताळ्याचा एक तुकडा खाऊन पाहायचा. छान ताज गोडसर रताळं घ्यायचं. 

२. रताळ्याची सालं काढू नका. सालासकट रताळ्याचे गोल काप करुन घ्यायचे. काप करताना जरा जाडंच करायचे. फार पातळ काप करायचे नाहीत. छान जाड काप करायचे. 

३. एक मोठा तवा किंवा पॅन घ्यायचा. त्यात चार चमचे तूप घालायचे. तुपावर सगळे रताळ्याचे काप लावायचे. छान परतून घ्यायचे. काप लवून घ्यायचे मग झाकून ठेवायचे आणि वाफवायचे. रताळे व्यवस्थित शिजेपर्यंत झाकून ठेवायचे. दोन्ही बाजूने आलटून पालटून शिजवायचे. रताळं शिजल्यावर झाकण काढा आणि वाफ तसेच पाणी जाऊ द्या. मग आणखी थोडे तूप घालून खमंग परतायचे. कडा जरा कुरकुरीत होतील मग गॅस बंद करायचा. 

४. एका ताटात पिठीसाखर घ्यायची. नीट ताटात पसरवायची. मग त्यात परतलेले रताळ्याचे काप घोळवायचे. थोडा वेळ तसेच ठेवायचे. रताळं गरम कोमट असतानाच पि‍ठात घालायचे. म्हणजे पिठीसाखर छान चिकटते आणि त्याची चव मस्त लागते. खाताना सालं काढून खा किंवा सालासकटही खाऊ शकता.      

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.