Lokmat Sakhi >Food > खमंग-खुसखुशीत गुळपापडी करायला सोपी, पारंपरिक खुटखुटीत वडी-तोंडात ठेवताच विरघळते मस्त

खमंग-खुसखुशीत गुळपापडी करायला सोपी, पारंपरिक खुटखुटीत वडी-तोंडात ठेवताच विरघळते मस्त

sweet recipe, Delicious, crispy and melt-in-your-mouth Gulpapdi is very easy to make, try it : मस्त खमंग गुळपापडी घरी करणे अगदी सोपे. पाहा रेसिपी. फक्त काही मिनिटांचे काम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 15:08 IST2025-06-23T19:35:12+5:302025-06-24T15:08:56+5:30

sweet recipe, Delicious, crispy and melt-in-your-mouth Gulpapdi is very easy to make, try it : मस्त खमंग गुळपापडी घरी करणे अगदी सोपे. पाहा रेसिपी. फक्त काही मिनिटांचे काम.

sweet recipe, Delicious, crispy and melt-in-your-mouth Gulpapdi is very easy to make, try it | खमंग-खुसखुशीत गुळपापडी करायला सोपी, पारंपरिक खुटखुटीत वडी-तोंडात ठेवताच विरघळते मस्त

खमंग-खुसखुशीत गुळपापडी करायला सोपी, पारंपरिक खुटखुटीत वडी-तोंडात ठेवताच विरघळते मस्त

खमंग, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी गुळपापडी करायला अगदी सोपी, नक्की करुन पाहा 

विविध गोड पदार्थांच्या रेसिपी आपण घरी करत असतोच. (sweet recipe, Delicious, crispy and melt-in-your-mouth Gulpapdi is very easy to make, try it)महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गूळ पापडी.  
ही रेसिपी झटपट आणि सोपी तर आहेच. लहान मुल ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडतो. गुळ आणि तुपामुळे ही वडी शरीराला उष्णता देते. त्यामुळे ही वडी खाणे चांगले ठरते तसेच, गूळ आणि गव्हाच्या पिठामुळे ही वडी आयर्न आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. गुजरात मध्ये गुळपापडीला सुकडी या नावाने ओळखले जाते. 

काही ठिकाणी गुळपापडी नाचणीचे पीठ वापरुनही केली जाते. तसेच इतरही बाजरी, ज्वारीसारखी पीठं वापरुन ही रेसिपी काही जण करतात. मात्र पारंपरिक रेसिपीमध्ये गव्हाचे पीठ वापरले जाते. घरोघरी उपलब्ध असणारे पीठ म्हणजे गव्हाचेच. अगदी कमी वेळात काही गोड करायचे असेल तर ही रेसिपी लगेच करता येते. 

साहित्य 
कणीक, तूप, खसखस, सुकं खोबरं, गूळ, वेलची पूड

कृती
१. कणीक म्हणजे गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे. तसेच गूळ किसून घ्यायचा. कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यावर कणीक परतायची. मंद आचेवर कणीक परतायची. हळूहळू चमचाभर तूप घालत राहायचे. कणीक मऊ होईपर्यंत तूप घालायचे. कणीक मस्त मऊ व्हायला हवी. छान शिजली गेली की त्यात पुढील सामग्री घालायची.

२. कणीक मऊ करायची मात्र पातळ होणार नाही याची. काळजी घ्यायची. त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. तसेच  किसलेलं सुकं खोबरं घालायचं. चमचाभर खसखस घालायची. पुन्हा परतायचे. सगळं छान परतून झाल्यावर त्यात बारीक किसलेला गूळ घालायचा. गूळ विरघळून एकजीव व्हायला हवा. गूळ आणि कणीक एकजीव झाल्यावर गॅस बंद करायचा. 

३. एका मोठ्या खोलगट ताटलीला तूप लावायचे. त्यावर तयार पीठ गरम असतानाचा लावायचे. व्यवस्थित पसरवायचे. पसरवून झाल्यावर किमान पंधरा मिनिटांसाठी गार होऊ द्यायचे. नंतर सुरीने वड्या पाडून घ्यायच्या. वडी पटकन सुटते. वडी सुटल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायची.  

Web Title: sweet recipe, Delicious, crispy and melt-in-your-mouth Gulpapdi is very easy to make, try it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.