Lokmat Sakhi >Food > ऐश्वर्या नारकर सांगतात, उपवासासाठी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी! पारंपरिक गोड पदार्थ - होईल झटपट फस्त...

ऐश्वर्या नारकर सांगतात, उपवासासाठी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी! पारंपरिक गोड पदार्थ - होईल झटपट फस्त...

Sweet Potato Halwa Recipe For Fasting : sweet potato halwa recipe for fasting : vrat special sweet potato halwa : how to make sweet potato halwa for navratri fast : healthy sweet potato halwa for fasting : shakarkandi halwa recipe for vrat : उपवासासाठी केलेला रताळ्याचा हलवा फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यदायी आणि पौष्टिकसुद्धा आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 17:55 IST2025-09-22T14:05:34+5:302025-09-22T17:55:52+5:30

Sweet Potato Halwa Recipe For Fasting : sweet potato halwa recipe for fasting : vrat special sweet potato halwa : how to make sweet potato halwa for navratri fast : healthy sweet potato halwa for fasting : shakarkandi halwa recipe for vrat : उपवासासाठी केलेला रताळ्याचा हलवा फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यदायी आणि पौष्टिकसुद्धा आहे...

Sweet Potato Halwa Recipe For Fasting sweet potato halwa recipe for fasting vrat special sweet potato halwa upvas recipe sweet potato halwa | ऐश्वर्या नारकर सांगतात, उपवासासाठी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी! पारंपरिक गोड पदार्थ - होईल झटपट फस्त...

ऐश्वर्या नारकर सांगतात, उपवासासाठी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी! पारंपरिक गोड पदार्थ - होईल झटपट फस्त...

नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे. नवरात्रात आपल्यापैकी बऱ्याचजणांचे उपवास असतात. उपवास म्हटलं की, आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. नवरात्रीच्या (vrat special sweet potato halwa) नऊ दिवस उपवासादरम्यान, घरोघरी उपवासाचे अनेक पदार्थ हमखास केले जातात. उपवासाच्या पदार्थांमध्ये, साबुदाणा खिचडी, वडा, साबुदाण्याची उसळ, रताळ्याच्या किस असे काही कॉमन पदार्थ सगळ्यांच्याच घरी केले जातात. परंतु अनेकदा या नऊ दिवसांच्या उपवासात (Sweet Potato Halwa Recipe For Fasting) सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आशावेळी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं खावंसं वाटतं. उपवासाला रताळं उकडवून किंवा रताळ्याच्या किस तर आपण खातोच. परंतु रताळ्याचा असाच (shakarkandi halwa recipe for vrat) एक खास उपवासाचा पदार्थ फार चविष्ट लागतो, तो म्हणजे रताळ्याचा हलवा.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या वडिलांची खास उपवासासाठी केल्या जाणाऱ्या रताळ्याच्या हलव्याची रेसिपी इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. रताळ्याचा हलवा फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यदायी आणि पौष्टिकसुद्धा आहे. रताळ्यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन आणि पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात. उपवासाच्या दिवसांत गोड खाण्याची इच्छा होताच आपण हा रताळ्याचा हलवा झटपट तयार करू शकतो. ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलेली ही सोपी आणि स्वादिष्ट रताळ्याच्या हलव्याची रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. रताळं - ४ ते ५ 
२. दूध - ३ ते ४ कप 
३. साखर - १ वाटी
४. भोपळ्याच्या बिया - १ टेबलस्पून 
५. साजूक तूप - २ टेबलस्पून 

नवरात्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ९ दिवस उपवास, खातात दिवसातून फक्त एकच फल, ते ही एकदाच...

रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करा घरच्याघरीच! चमचमीत चवीची मेजवानी - शाही भाजीचा सुगंध दरवळेल घरभर... 

कृती :- 

१. रताळी स्वच्छ धुवून त्यावरची सालं काढून घ्या. 
२. त्यानंतर रताळ्याचे छोटे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. 
३. एका कढईत थोडे साजूक तूप घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात रताळ्याचे तुकडे घालावेत. 

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

४. साजूक तुपावर रताळी चांगली २ ते ३ मिनिटे परतवून घ्यावीत. रताळ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावे. झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढावी. 
५. त्यानंतर यात दूध (दूध सायीसहित घाला) घालावे. 
६. मग यात भोपळ्याच्या बिया व चवीनुसार साखर घालावी. आता सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.  

रताळ्याचा खमंग असा झटपट तयार होणारा गरमागरम हलवा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Sweet Potato Halwa Recipe For Fasting sweet potato halwa recipe for fasting vrat special sweet potato halwa upvas recipe sweet potato halwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.