सॅण्डविच हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी थोडीशी भूक लागली तर स्नॅक्स म्हणून असं कधीही सॅण्डविच खाता येतं. पण त्यामध्ये ब्रेड असल्याने अनेकांना ते नकोसं वाटतं. कारण ब्रेडमध्ये मैदा असल्याने ते सॅण्डविच टाळतात. किंवा बऱ्याचदा ब्रेडमुळेच मुलांनाही सॅण्डविच जास्त द्यायला नको वाटतं. म्हणूनच आता मुलांना ब्रेड अजिबात न घालता केलेलं कॉर्न सॅण्डविच खायला द्या. त्यांना तुम्ही ते डब्यातही देऊ शकता. या सॅण्डविचमध्ये ब्रेड मुळीच नाहीत आणि त्याऐवजी भाज्या मात्र भरपूर आहेत. त्यामुळे ते अतिशय पौष्टिक आहे.. (corn sandwich recipe)
कॉर्न सॅण्डविच रेसिपी
साहित्य
२ वाट्या उकडलेले स्वीट कॉर्न
१ वाटी रवा
सिमला मिरची, पत्ताकोबी यांचे बारीक काप मिळून १ वाटी
१ टीस्पून ओरिगॅनो आणि चिलीफ्लेक्स
रेस्टॉरंटस्टाईल काजू करी आता घरीच करा, दिवाळीत आलेल्या पाहुण्यांसाठी खास बेत, जेवण होईल चमचमीत
१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट
२ ते ३ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे
आवडीनुसार किसून घेतलेलं चीज
१ टीस्पून बेकिंग सोडा
कृती
सगळ्यात आधी उकडलेले कॉर्न मिक्सरच्या भांड्यात टाका आणि थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट आता एका भांड्यात काढा.
त्यामध्ये रवा, बारीक चिरलेल्या भाज्या, ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स, आलं लसूण पेस्ट आणि बेकिंग सोडा असं सगळं घालून ते पीठ कालवून घ्या. पीठ थोडं घट्टच असावं.
यानंतर सॅण्डविच मेकरला तेल लावा. त्यावर तयार केलेलं पीठ टाका. त्यानंतर थोडं चीज घाला आणि वरून पुन्हा पीठ घाला. आता हे सॅण्डविच तयार करायला ठेवा. २ ते ३ मिनिटांत छान क्रिस्पी कॉर्न चीज सॅण्डविच टोस्ट तयार झालेलं असेल. एकदा ट्राय करून पाहा.