Join us

उन्हाळ्यासाठी खास पदा‌र्थ-झटपट ताकाची उकड; द्या खास फोडणी-उकड लागेल चविष्ट-पचायलाही हलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 15:24 IST

summer special , Ukaad recipe easy and healthy : नेहमीचीच ताकाची उकड, पण एका हटके फोडणी सकट तयार करा. उकड एकदम चविष्ट लागेल.

तांदळाची उकड हा पदार्थ तर घरोघरी तयार केला जातो. घाईगडबड असताना पटकन काही नाश्ता तयार करायचा असेल, तर मग आपण उकड तयार करतो. (summer special , Ukaad recipe easy and healthy )एकदम झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे. पण बरेचदा सगळ्यांना तो फिका वाटतो. किंवा चवहीन आहे असं ते म्हणतात. तुमच्या घरच्यांनाही उकड चवविरहीत वाटते का? तर काही साध्या टिप्स आहेत. ज्यांचा वापर केल्यावर उकड मस्त चविष्ट होईल. (summer special , Ukaad recipe easy and healthy )

उकड तयार करण्यासाठी लागणारे साहित्यताक, तांदळाचे पीठ, मीठ, हळद,  लसूण, आलं, हिरवी मिरची, जीरं, मोहरी, तेल, हिंग, कडीपत्ता  

लसूण भरपूर घ्यायची. बरेचदा लसूण कमी पडते त्यामुळे चव लागत नाही. लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून मग ती फोडणीस टाका. असं केल्याने लसणाची चव जास्त छान लागते. 

कृती १. ताकामध्ये तांदळाचे पीठ घाला. दिड वाटी ताकाला एक वाटी पीठ असे प्रमाण घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. (summer special , Ukaad recipe easy and healthy )

२. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. ते जरा गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेली लसूण किसलेलं आलं घाला. हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घाला. जीरं व मोहरी थोडं नंतर घाला त्यामुळे ते करपत नाही. कडीपत्त्याचे तुकडे करून घाला. हिंग घाला. सगळं मस्त परतून घ्या. घाई करू नका. लसूण लाल होऊ द्या. शेवटी मीठ व हळद घाला.

३. त्यात ताक व तांदळाच्या पीठाचे मिश्रण घाला. व्यवस्थित सगळं ढवळून घ्या. मंद आचेवर वाफवा. झाकून ठेवा. ५ ते ७ मिनिटात व्यवस्थित वाफाळलेली उकड तयार होते.

४. आता एक छान फोडणी तयार करा त्यासाठी लसूण आणि लाल तिखट वापरा. लसूण शरीरासाठी चांगली असते. त्यामुळे ती वापरण्यासाठी हयगय करू नका. लसूण तिखटाची फोडणी उकड वाढून घेतल्यावर वरतून घाला. उकडीची चव दुप्पट होते.

५. उकड तयार करताना सर्वच पदार्थ भरपूर वापरा म्हणजे ती फिकी होत नाही. तसेच ताक थोडं आंबट असेल तर चव आणखी छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनासमर स्पेशल