उन्हाळ्याची खरी मजा म्हणजे उन्हाळ्यात केले जाणारे वाळवणाचे वेगवेगळे पदार्थ. बाजरीच्या खारोड्या, कोंड्याच्या खारोड्या, सांडगे, कुरडई, पापड असे वेगवेगळे पदार्थ पाहिले किंवा त्यांची नुसती आठवण जरी केली तरी अक्षरश: तोंडाला पाणी सुटते. या पदार्थांच्या यादीमध्ये बटाट्याचे चिप्स, साबुदाण्याचे पळीपानं, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या असे उपवासाचे पदार्थही असतातच. हे पदार्थ तळल्यानंतर जेवढे छान लागतात, तेवढीच मजा ते पदार्थ अर्धवट ओलसर असताना खाण्यात येते..(how to make sabudana batata chakali?) आता तुम्हालाही उन्हाळी वाळवणाच्या निमित्ताने वर्षभर उपवासाला पुरतील एवढ्या साबुदाणा- बटाटा चकल्या करायच्या असतील तर पुढे सांगितलेली एक अगदी सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा..(sabudana chakali recipe for summer)
वाळवण स्पेशल- साबुदाणा, बटाटा चकली रेसिपी
साहित्य
१ किलो साबुदाणा
१ किलो बटाटे
१० ते १२ हिरव्या मिरच्या
वय वाढलं तरी राहाल धडधाकट आणि फिट! सकाळी उठल्यावर ३ गोष्टी करा, वजनही राहील कंट्रोलमध्ये
उपवासाला चालत असतील तर १ टेबलस्पून जिरे
चवीनुसार मीठ
कृती
साबुदाणा चकली करण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर उपवासाची खिचडी करण्यासाठी ज्या प्रमाणे साबुदाणा भिजवतो, तेवढंच पाणी घालून साबुदाणा चांगला १० ते १२ तास भिजवून घ्या.
यानंतर बटाटे उकडून घ्या. उकडून थंड झालेले बटाटे किसून घ्या. आता भिजवलेला साबुदाणा आणि किसून घेतलेले बटाटे एका मोठ्या भांड्यात एकत्र करा.
काही घरांमध्ये उपवासाला जिरे चालत नाहीत. जर तुमच्याकडे जिरे चालत असतील तर ते आधी मंद आचेवर भाजून घ्या आणि त्यानंतर जिरे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून साबुदाणा- बटाटा यांच्या मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घालून चकलीचं पीठ मळून घ्या. यानंतर चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून त्याच्या छान बारीक बारीक चकल्या करून घ्या. मस्त खुसखुशीत, खमंग चकली तयार..
Web Summary : Make delicious Sabudana and potato chaklis for summer. This simple recipe creates a crispy snack, perfect for fasting and enjoying year-round.
Web Summary : गर्मी के लिए स्वादिष्ट साबूदाना और आलू की चकली बनाएं। यह आसान रेसिपी एक कुरकुरा नाश्ता बनाती है, जो व्रत के लिए एकदम सही है और इसे साल भर आनंद लिया जा सकता है।