Join us  

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 3:45 PM

How To Keep Lemons Fresh And Juicy For Months: उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे लिंबू अधिककाळ साठवून ठेवण्याचा हा सोपा उपाय माहिती करून घ्या...

ठळक मुद्देजास्त दिवस लिंबू कसे टिकवून ठेवायचे, याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या.

उन्हाळा म्हटलं की लिंबाचं थंडगार सरबत पाहिजेच. सरबत प्यायलं की कसं एकदम फ्रेश झाल्यासारखं, अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात असं बऱ्याचदा होतं की या दिवसात लिंबू लागतात म्हणून आपण बाजारातून भरपूर लिंबू आणतो (Summer Special Hacks) आणि ते फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण काही दिवसांतच ते खराब होतात. सडू लागतात (How to store lemons properly). असं होऊ नये म्हणून जास्त दिवस लिंबू कसे टिकवून ठेवायचे, याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या. हा उपाय केल्यास अगदी ३- ४ महिने तरी लिंबांना काहीही होणार नाही. (Proper method for the storage of lemons)

 

लिंबू जास्त दिवस कसे टिकवायचे?

लिंबू जास्त दिवस कसे टिकवायचे याचा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय केल्यास अगदी ६ महिने लिंबू चांगले टिकू शकतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

जेव्हा लिंबाच्या किमती एकदम कमी असतील तेव्हा भरपूर लिंबू घेऊन ठेवायचे. आणि लिंबू जेव्हा महाग होतील, तेव्हा अशा पद्धतीने साठवलेले लिंबू वापरायचे. 

प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

सगळ्यात आधी तर बाजारातून आणलेले लिंबू स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्यावरून हलकासा तेलाचा हात फिरवा.

तेल लावलेले लिंबू आता एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरा आणि फ्रिजरमध्ये ठेवून द्या. महिनोंमहिने या लिंबांना काहीही होणार नाही.

 

साठवलेले लिंबू कसे वापरायचे?

वरीलप्रमाणे तुम्ही लिंबू फ्रिजरमध्ये साठवून ठेवले असेल तर ते जेव्हा तुम्ही वापरायला काढाल तेव्हा ते एकदम कडक झालेले असेल. 

केस खूप गळतात- पांढरे झाले? केमिकल्सचे शाम्पू वापरणं सोडा आणि 'हा' नॅचरल शाम्पू लावून पाहा

त्यामुळे एका ग्लासमध्ये पाणी घ्या. पाणी रुम टेम्परेचरचे असावे. या पाण्यात आता अर्धा तास लिंबू बुडवून ठेवा. यानंतर लिंबू अगदी मऊ आणि रसरशीत झालेले असेल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल