Lokmat Sakhi >Fashion > प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir: काठपदर साडी, काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली अशा थाटात अयोध्येला गेलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या साडीची किंमत बघा किती होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 02:19 PM2024-03-22T14:19:53+5:302024-03-22T14:58:48+5:30

Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir: काठपदर साडी, काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली अशा थाटात अयोध्येला गेलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या साडीची किंमत बघा किती होती...

Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir with hubby Nick Jonas and daughter Malati Merie, Priyanka Chopra's yellow saree worth Rs 63k | प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

Highlightsहातात काचेच्या बांगड्या, काठपदराची साडी, कपाळावर टिकली अशा थाटातली प्रियांका अतिशय देखणी दिसत होती.

बाॅलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आत एक ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते. जागतिक दर्जाची सेलिब्रिटी असली तरी काही काही बाबतीत प्रियांका मात्र पुर्णपणे 'देसी गर्ल' आहे. तिची मुलगी मालतीच्या हातात तिने एखाद्या सर्वसामान्य भारतीय आईप्रमाणे काळे मणी घातले होते. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये, सण- उत्सवांमध्ये ती तिच्या मुलीला आणि नवऱ्यालाही आवर्जून सहभागी करून घेते. यावरूनच परादेशात स्थायिक झाली असली, विदेशी व्यक्तीशी लग्न केलेलं असलं तरीही प्रियांका ही मनाने खरोखरच 'देसी गर्ल' आहे हे यावरून दिसून येतं (Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir). आता अयोध्येला जाऊन प्रियांकाने पुन्हा एकदा तिचं देसी रूप दाखवून दिलं आहे. (Priyanka Chopra's yellow saree worth Rs 63k)

 

प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मिडियावर तिचे अयोध्येच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. ती नवरा निक जोनास, मुलगी मालती मेरी आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबत नुकतीच अयोध्येला जाऊन आली.

मेकअप चेहऱ्यावर थापल्यासारखा दिसतो? चेहरा भुरकट- काळा होतो? मेकअप परफेक्ट होण्यासाठी ३ टिप्स

यावेळी प्रियांकाचा लूक पुर्णपणे भारतीय थाटातला होता. हातात काचेच्या बांगड्या, काठपदराची साडी, कपाळावर टिकली अशा थाटातली प्रियांका अतिशय देखणी दिसत होती. नवऱ्यानेही कुर्ता- पायजमा असा पारंपरिक भारतीय पोषाख केला होता तर मुलगी मालतीलाही तिने भारतीय धाटणीचे कपडे घातले होते.

 

प्रियांकाने जी साडी नेसली होती ती रॉ मँगो या ब्रॅण्ड हाऊसची असून ती चंदेरी सिल्क या प्रकारातली आहे. तिच्या त्या साडीवर नाजूक फुल आणि पानांचे विणकाम केलेले होते.

मसाला ताक करण्याची शिल्पा शेट्टीची स्पेशल रेसिपी- ऊन बाधणार नाही, उन्हाळ्यातही राहाल कुल

या साडीची किंमत तब्बल ६३ हजार ८०० रुपये असल्याचे रॉ मँग्रो या ब्रॅण्डच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहायला मिळतं. प्रियांकाने अयोध्येला भेट देऊन रामललाचं दर्शन घेतलं यासाठी तिचे चाहते तर तिचं कौतूक करतच आहेत. पण निकही तिची संस्कृती, परंपरा समजून घेतो यामुळे चाहते त्याचंही तोंडभरून कौतूक करत आहेत. 

 

Web Title: Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir with hubby Nick Jonas and daughter Malati Merie, Priyanka Chopra's yellow saree worth Rs 63k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.