Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Special Drinks : कैरी - पुदिन्याचे मिश्रण म्हणजे तोंडात चवींचा धमाका !! एकदा हे सरबत पिऊन तर पाहा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 17:29 IST

Summer Special Drinks: The combination of Kairi and Mint is an explosion of flavors !! Try this drink once : कैरी पुदिन्याचं सरबत, रेसिपी नक्की करुन पाहा.

उन्हाळ्यासाठी खास रेसिपी. नक्की करा पुदिना आणि कैरीचे सरबत करायला सोपे आणि चवीला एकदम भारी. एकदा करुन फ्रिजमध्ये ठेवा आठवडाभर नक्की टिकते. (Summer Special Drinks: The combination of Kairi and Mint is an explosion of flavors !! Try this drink once )फारच मस्त आणि वेगळी रेसिपी आहे. पाहा कशी करावी. 

साहित्य कैरी, पुदिना, पाणी, लिंबू, सब्जा, मीठ, जिरे, बडीशेप, काळीमिरी, बर्फ, धणे - जिरे पूड, चाट मसाला, आलं, साखर, सैंधव मीठ

कृती१. कैरी सोलून घ्यायची. त्याला दोन्ही बाजूनी चिर द्यायचे. पूर्ण तुकडे करु नका. फक्त चिर द्या. कुकरच्या भांड्यात ठेवा त्यात पाणी ओता आणि शिजवून घ्या. कैरी मस्त शिजू द्यायची. शिजल्यावर त्याचे तुकडे करायचे बाट काढून घ्यायची. गार करत ठेवायची. थोडा सब्जा भिजवायचा.  

२. एका पॅनमध्ये चमचाभर काळीमिरी घ्यायची. तसेच थोडं जिरं घ्यायचं. बडीशेप घ्यायची. सगळं भाजून घ्यायचं. गार करत ठेवायचं. गार झाल्यावर त्याचा मसाला वाटून घ्यायचा. हा मसाला इतरही पदार्थांसाठी वापरु शकता. भाजीचीही चव वाढवतो. 

३. कैरीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात पुदिन्याची पानं घालायची. आल्याचे लहान तुकडे करुन त्यात घालायचे. वाटून घ्यायचे आणि एकजीव मिश्रण तयार करायचे. सगळं छान वाटलं जाईल याची काळजी घ्यायची. 

४. एका कढईत साखर घ्यायची. त्यात पाणी ओतायचे आणि पाक तयार करुन घ्यायचा. छान एकतारी पाक तयार झाला की त्यात वाटून घेतलेले पुदिना - कैरीचे मिश्रण ओतायचे. ढवळून घ्यायचे आणि आटवायचे. एकजीव करायचे आणि आटेपर्यंत ढवळत राहायचे. छान एकजीव आणि जरा घट्ट मिश्रण तयार झाले की गार होऊ द्यायचे. त्यात चवीनुसार मीठ , धणे - जिरे पूड घालायची. तसेच थोडा चाट मसाला घालायचा. सैंधव मीठ घालायचे. सगळं मिक्स करुन घ्यायचं. 

५. एका पातेल्यात बर्फ घ्यायचा त्यात तयार केलेले मिश्रण ओतायचे. गरजेनुसार पाणी ओतायचे. भिजवलेला सब्जा घालायचा, लिंबाचा रस घालायचा. गरेगार सरबत प्या. मस्त लागते. उरलेले मिश्रण हवाबंद बाटलीमध्ये साठवा. फ्रिजमध्ये ठेवा काही दिवसांसाठी  टिकते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Summer cooler: Raw mango and mint drink, a flavor explosion!

Web Summary : Beat the heat with this easy raw mango and mint cooler! Boil raw mangoes, blend with mint, and create a flavorful syrup. Mix with water, spices, and sabja seeds for a refreshing drink. Store the concentrate for later!
टॅग्स :अन्नउन्हाळासमर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आंबा