रोज सकाळी नाश्त्यासाठी काय मेन्यू करावा हा प्रश्न सगळ्याच महिलांना पडतो. नाश्त्याचा पदार्थ थोडा चटपटीतही असायला हवा आणि पौष्टिकही असायला हवा. शिवाय दिवसाची सुरुवातच तो पदार्थ खाऊन होत असते. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी तो आनंदाने खावा असंही वाटतंच. म्हणूनच नाश्त्याचा मेन्यू ठरवताना खूपदा गोंधळ उडतो. म्हणूनच आता ही एक मस्त उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहा (summer special cucumber sandwich). यामध्ये आपण थंडगार काकडी सॅण्डविच कसे तयार करायचे ते पाहणार आहोत.(how to make cucumber sandwich?) काकडी, दही, क्रिम असं सगळं घालून केलेले सॅण्डविच नक्कीच घरातल्या सगळ्यांना आवडतील.(easy and tasty recipe of kakadi sandwich)
काकडी सॅण्डविच रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराची फ्रेश काकडी
१ कप थंडगार चक्का दही किंवा मग ग्रीक योगर्ट
२ ते ३ टेबलस्पून मलाई
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१ टीस्पून ओरिगॅनो
१ टीस्पून मिरेपूड
१ टीस्पून चाट मसाला
१ टीस्पून मीठ आणि ब्रेड स्लाईस
कृती
सगळ्यात आधी दही किंवा योगर्ट एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये मलाई टाकून ते थोडं फेटून घ्या.
आता दही आणि मलाईच्या मिश्रणामध्ये चाट मसाला, मिरेपूड आणि मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिश्रण फेटून घ्या.
पांढरे केसही होतील काळे!! पाण्यात ३ पदार्थ घालून केसांना लावा- पांढऱ्या केसांचे टेन्शन विसरा
यानंतर ब्रेडची एक स्लाईस घ्या. त्या स्लाईसला दही- मलाईचं मिश्रण लावा. यानंतर त्यावर काकडीचे पातळ गोलाकार काप ठेवा.
काकडीच्या कापांवर ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स आणि हवंतर पुन्हा थोडा चाट मसाला घाला.
यानंतर ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसवरही दही- मलाईचं मिश्रण लावा आणि ताे ब्रेड काकडी लावलेल्या ब्रेड स्लाईसवर ठेवा.
यानंतर नेहमीप्रमाणे सॅण्डविचसाठी ब्रेड कापतो तसा तो तिरका कापा.. थंड थंड काकडी सॅण्डविच तयार. हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.