Lokmat Sakhi >Food > इडली चटणी चाट, उन्हाळी सुटीतला सुपरहिट पदार्थ! मुलांनाही आवडेल खातील पोटभर आनंदाने..

इडली चटणी चाट, उन्हाळी सुटीतला सुपरहिट पदार्थ! मुलांनाही आवडेल खातील पोटभर आनंदाने..

Idli chaat recipe at home: Summer special food for kids: Healthy snacks for kids in summer: Fun summer recipes for children: Best chaat recipes with idli: Tasty and healthy Indian snacks for kids: आपण या इडलीला एक वेगळा ट्विस्ट देऊन त्याची चव वाढवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:01 IST2025-03-31T17:01:02+5:302025-03-31T17:01:40+5:30

Idli chaat recipe at home: Summer special food for kids: Healthy snacks for kids in summer: Fun summer recipes for children: Best chaat recipes with idli: Tasty and healthy Indian snacks for kids: आपण या इडलीला एक वेगळा ट्विस्ट देऊन त्याची चव वाढवू शकतो.

summer holiday special food for kids how to make idli chat at home know the recipe | इडली चटणी चाट, उन्हाळी सुटीतला सुपरहिट पदार्थ! मुलांनाही आवडेल खातील पोटभर आनंदाने..

इडली चटणी चाट, उन्हाळी सुटीतला सुपरहिट पदार्थ! मुलांनाही आवडेल खातील पोटभर आनंदाने..

नाश्त्यात काय बनवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. पोहे, उपमा, शिरा खाऊन अनेकांना वैताग येतो. (Idli chaat recipe at home) रोज तेच तेच पदार्थ नकोसे वाटतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मुलांना देखील अनेक नवीन पदार्थांची चव चाखावीशी वाटते. साउथ इंडियन स्टाईलचा डोसा, मेदू वडा किंवा इडली बनवली की, बरेचदा नाक मुरडतात. (Summer special food for kids)
मुलांना सतत बाहेरचे जंक फूड खाण्याची इच्छा होते. रस्त्यावरची पाणीपुरी, भेलपुरी किंवा चाट त्यांना अधिक आवडू लागतो.(Healthy snacks for kids in summer) त्यामुळे त्यांना भूक लागली की ते अशाप्रकारचे पदार्थ आपल्याकडे नाश्त्यात मागतात. इडली-सांभार देखील त्यांना खायचा कंटाळा येतो. उन्हाळ्यात इडली डोशाचे पीठ फसफसते किंवा आंबते परंतु, आपण या इडलीला एक वेगळा ट्विस्ट देऊन त्याची चव वाढवू शकतो. ही स्नॅक रेसिपी फक्त ३० मिनिटांत बनवता येईल. पाहूयात सोपी रेसिपी (Fun summer recipes for children)

वर्षभर टिकणारं लाल मिरचीचे लोणचं, कमीत कमी तेलात करा झणझणीत लोणचं, पारंपरिक रेसिपी

साहित्य 

इडलीचे तुकडे - ५ ते ६ 
इडली - १
बारीक चिरलेले आले- १ इंच 
तूप - १ चमचा 
हिंग - १/४ चमचा 
लाल मिरची पावडर - १/२ चमचा 
पाणी 
चिरलेला कांदा - १/२ कप 
डाळिंबाचे दाणे - २ चमचे 
मीठ - चवीनुसार 
तेल - १ चमचा 
हिरवी मिरची - १ 
दही - अर्धा कप 
पिठी साखर - १ चमचा 
हिरवी चटणी - २ चमचे 
चिंच चटणी - २ चमचे
शेव - १ चमचा 
तळलेली इडली - १ 
जिरे पावडर - चिमुटभर 
कोथिंबीर - भुरभुरण्यासाठी 

">

 

कृती 

1. सगळ्यात आधी इडल्या हलक्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्याचे ४ ते ५ तुके करा. 

2. आता एका कढईत तूप, तळलेल्या इडल्या, हिंग, लाल मिरची पावडर आणि पाणी घालून मिनिटभर उकळवून घ्या. 

3. गॅस बंद करुन थंड होण्यासाठी ठेवा. एका भांड्यात कांदा, डाळिंबाचे दाणे, तेल, हिरवी मिरची आणि मीठ घालून मिश्रण तयार करा. 

4. बाऊलमध्ये दही, पिठीसाखर आणि मीठ घालून बाजूला ठेवा. 

5. चाट तयार करण्यासाठी सर्व्हिंग प्लेटमध्ये घेऊन उकळवलेली इडलीवर कांदा घाला. त्यावर दह्याचे मिश्रण, हिरवी आणि चिंच चटणी घाला. 

6. आता त्यावर शेव, लाल मिरची पावडर, जिरेपूड, तळेलली इडली आणि कोथिंबीर घाला. तयार होईल हेल्दी आणि पौष्टिक इडली चाट 
 

Web Title: summer holiday special food for kids how to make idli chat at home know the recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.