lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उकडीचे असोत किंवा तळणीचे, मोदकासाठी खास करा ३ प्रकारचे झटपट सारण, चवीला भारी - मोदक होतील चविष्ट

उकडीचे असोत किंवा तळणीचे, मोदकासाठी खास करा ३ प्रकारचे झटपट सारण, चवीला भारी - मोदक होतील चविष्ट

Stuffing for Modak | How to make Modak Filling : कमी जिन्नस वापरून करा झटपट ३ प्रकारचे सारण, मोदक फुटण्याचं टेन्शन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 11:31 AM2023-09-18T11:31:49+5:302023-09-18T18:49:54+5:30

Stuffing for Modak | How to make Modak Filling : कमी जिन्नस वापरून करा झटपट ३ प्रकारचे सारण, मोदक फुटण्याचं टेन्शन सोडा

Stuffing for Modak | How to make Modak Filling | उकडीचे असोत किंवा तळणीचे, मोदकासाठी खास करा ३ प्रकारचे झटपट सारण, चवीला भारी - मोदक होतील चविष्ट

उकडीचे असोत किंवा तळणीचे, मोदकासाठी खास करा ३ प्रकारचे झटपट सारण, चवीला भारी - मोदक होतील चविष्ट

महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थांच्या यादीत मोदकाचा देखील समावेश आहे. मोदक फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, परदेशातही आवडीने खाल्ली जाते. मोदक अनेक प्रकारचे केले जातात. मुख्य म्हणजे गणेशोत्सवात मोदक चवीने खाल्ले जातात. घरोघरी उकडीचे आणि तळणीचे मोदक आवर्जून केले जातात. मोदकाची पारी जरी वेगळी असली तरी, सारण मात्र, एकच प्रकारचे केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात आपण घरात तीन प्रकारचे सारण तयार करू शकता.

मुख्य म्हणजे सारणामुळेच मोदकाची चव वाढते. जर मोदकाचे सारण योग्य साहित्य आणि योग्य प्रमाणाचा वापर करून केल्यास परफेक्ट मोदक तयार होतात. मोदक तयार करण्यासाठी तीन प्रकारचे सारण कशा पद्धतीने तयार करायचे पाहूयात(Stuffing for Modak | How to make Modak Filling).

ओल्या नारळाचे सारण

ओल्या नारळाचे सारण करण्यासाठी लागणारं साहित्य

ओलं खोबरं

सुकामेवा

उरलेले तेल फेकू नका, करा ४ स्मार्ट उपयोग - महागडे तेल वाया न जाता होतील कामे

गुळ

खसखस

पिठीसाखर

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, गरम कढईत दोन चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात बारीक चिरलेला सुकामेवा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात २ कप किसलेलं ओलं खोबरं घालून मिक्स करा. खोबरं किसलेलं नसेल तर, मिक्सरमधून वाटून घ्या, व मध्यम आचेवर खोबरं भाजून घ्या. २ मिनिटं खोबरं भाजून झाल्यानंतर त्यात एक कप गुळ आणि २ चमचे भाजलेली खसखस घाला. त्यानंतर चमच्याने सतत ढवळत राहा. गुळ खोबऱ्यात विरघळल्यानंतर त्यात एक चमचा पिठीसाखर व चिमुटभर वेलची पूड घालून मिक्स करा, व गॅस बंद करा. अशा प्रकारे ओल्या नारळाचे सारण रेडी.

सुक्या खोबऱ्याचे सारण

सर्वप्रथम, कढईत २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला सुकामेवा घालून भाजून घ्या. नंतर त्यात दीड कप किसलेलं सुकं खोबरं घालून भाजून घ्या. किसलेलं नसेल तर, सुकं खोबरं मिक्सरमधून वाटून घ्या. मध्यम आचेवर सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर त्यात २ चमचे भाजलेली खसखस घाला. नंतर त्यात अर्धा कप गुळ घालून मिक्स करा, व सतत चमच्याने ढवळत राहा. गुळ खोबऱ्यात विरघळल्यानंतर त्यात चिमुटभर वेलची पूड घाला व गॅस बंद करा. अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याचे सारण रेडी.

ना उकड ना तळण, ओल्या नारळाचे करा झटपट मोदक, कमी वेळ आणि कमी साहित्यात मस्त मोदक

खोबरं - रव्याचे सारण

गरम कढईत दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक कप बारीक रवा घालून भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात २ चमचे भाजलेली खसखस, २ चमचे पांढरे तीळ, वाटीभर सुकामेवा घालून मिक्स करा. नंतर त्यात एक वाटी सुकं खोबरं घालून सतत चमच्याने ढवळत राहा. नंतर त्यात अर्धी वाटी पिठीसाखर आणि अर्धी वाटी गुळ घालून परतवून घ्या. साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यात चिमुटभर वेलची पूड घाला. व गॅस बंद करा. अशा प्रकारे खोबरं - रव्याचे सारण रेडी.

Web Title: Stuffing for Modak | How to make Modak Filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.