Join us

कोलेस्टेरॉल होईल कमी, चरबी झरझर होईल कमी; वैज्ञानिकांनी सांगितलं रोज किती बदाम खावेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:57 IST

Almond Benefits : अलिकडे बदामाच्या फायद्यांबाबत एक रिसर्च समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, रोज बदाम खाल्ल्यानं हृदय आणि शरीराचं आरोग्य किती चांगलं राहू शकतं.

Almond Benefits : बदाम हे एक सुपरफूड आहे. ज्यात अनेक व्हिटामिन्स असतात आणि प्रोटीन असतं. जे शरीरासाठी खूप आवश्यक असतात. अशात अलिकडे बदामाच्या फायद्यांबाबत एक रिसर्च समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, रोज बदाम खाल्ल्यानं हृदय आणि शरीराचं आरोग्य किती चांगलं राहू शकतं.

करन्ट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये 11 वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी बदाम व कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यावर आतापर्यंत झालेल्या रिसर्चचं विश्लेषण केलं. यात त्यांना आढळलं की, बदाम खाल्ल्यानं हृदय निरोगी राहतं, वजन कंट्रोल ठेवण्यास, पचन तंत्र मजबूत राहतं.

रोज किती बदाम खावेत?

एक्सपर्ट सांगतात की, जर एका व्यक्तीनं रोज 50 ग्रॅम म्हणजे साधारण दोन मूठ भरून बदाम खाल्ले तर त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. 

कोलेस्टेरॉल आणि बीपी कंट्रोल

बदाम खाल्ल्यानं शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच यानं डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी करण्यासही मदत मिळते. जर बदाम इतरही काही पदार्थांमध्ये मिक्स करून खाल्ले तर जास्त फायदा मिळू शकतो.

वजन कमी होईल

या रिसर्चचे लेखक डॉ. एडम ड्रेवनोव्स्की म्हणाले की, नियमितपणे बदाम खाल्ल्यानं वजन वाढत नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर रोज थोडे बदाम खायला हवेत.

बदाम भिजवून खाणं जास्त फायदेशीर

बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते. त्यामुळे भिजवलेलेच बदाम खाणं चांगलं ठरतं.

टॅग्स :अन्नआरोग्य