संध्याकाळच्या वेळी भूक लागली की आपल्याला काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. सॅण्डविच, वडापाव, पाणीपुरीसारखे चाट तर आपण नेहमीच खातो.(Ragda chaat recipe) पण अनेकदा आपल्या पोट भरेल असा पदार्थ हवा असतो. अशावेळी आठवण येते ती रस्त्यावरील चाटची. गरमागरम रगडा, त्यावर गोड-आंबट चटणी, खमंग मसाले आणि शेव यांचा संगम म्हणजे रगडा चाट.(Street style ragda chaat) बाहेरचे चाट कितीही चविष्ट असले तरी स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न नेहमीच पडतो. म्हणूनच घरच्या घरी, सोप्या साहित्यांत आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेली रगडा चाट रेसिपी हा उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी केवळ चविष्टच नाही तर पोटभरीची आणि पौष्टिकही आहे.
घरी रगडा चाट बनवायचे म्हटले की वाटाणे भिजवा, शिजवा, मसाले, कांदा बारीक चिरा अशा भांड्यांच्या पसाऱ्यामुळे आपण बेत रद्द करतो. पण आपल्याला हा रगडा चाट अगदी काही मिनिटांत एकाच भांड्यात तयार करता येईल. अशाच एका 'वन-पॉट' रेसिपीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये चव अगदी बाहेरच्या चाटसारखीच असेल. हा रगडा चाट कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य पाहूया.
आजी- आजोबा दिवस,रात्र गुडघेदुखीने हैराण? घरीच करा लवंगाचे जादुई तेल, वेदना होतील गायब- त्रासही कमी
साहित्य
पांढरे वाटाणे - ३/४ कप
उकडलेले बटाटे- २
टोमॅटो - १
हळद पावडर - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
चिंच चटणी - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
चाट मसाला - १ चमचा
कुटलेली लाल मिरची - १ चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कांदा- १
हिरव्या मिरच्या - २
कृती
1. सगळ्यात आधी वाटाणे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. आता कुकरच्या भांड्यात भिजवलेले वाटाणे, बटाटा, टोमॅटो, हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि पाणी घालून तीन शिट्ट्या मारुन घ्या.
2. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील टोमॅटो आणि बटाटे काढून घ्या. चमच्याने वाटाणे ढवळून घ्या. त्यात बटाटे किसून घाला.
3. यामध्ये आता मिरची पावडर, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून पुन्हा चमच्याने ढवळून घ्या.
4. बाऊलमध्ये तयार रगडा, हिरवी चटणी, चिंच चटणी, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा वन पॉट रगडा चाट.
