Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > विकतचे सरबत म्हणजे साखरेचा पाक !! अर्कही तयार करा घरीच, कोकम सरबत करण्याची सोपी पद्धत

विकतचे सरबत म्हणजे साखरेचा पाक !! अर्कही तयार करा घरीच, कोकम सरबत करण्याची सोपी पद्धत

Store-bought kokum syrup is just sugar syrup - see How to make kokum extract at home : घरीच करा मस्त कोकम सरबत झटपट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 16:07 IST2026-02-25T16:06:22+5:302026-02-25T16:07:42+5:30

Store-bought kokum syrup is just sugar syrup - see How to make kokum extract at home : घरीच करा मस्त कोकम सरबत झटपट.

Store-bought kokum syrup is just sugar syrup - see How to make kokum extract at home | विकतचे सरबत म्हणजे साखरेचा पाक !! अर्कही तयार करा घरीच, कोकम सरबत करण्याची सोपी पद्धत

विकतचे सरबत म्हणजे साखरेचा पाक !! अर्कही तयार करा घरीच, कोकम सरबत करण्याची सोपी पद्धत

उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि चवीलाही आंबट-गोड असे खास पेय म्हणजे कोकम सरबत. कोकणात विशेष लोकप्रिय असलेले हे पारंपरिक पेय आता सर्वत्र आवडीने प्यायले जाते. बाजारात तयार कोकम सिरप सहज मिळते, पण घरी केलेले कोकम सरबत अधिक नैसर्गिक, ताजे आणि आरोग्यदायी असते. (Store-bought kokum syrup is just sugar syrup - see How to make kokum extract at home)पचनाच्या अनेक तक्रारी बंद होतील, फक्त हे सरबत रोज नक्की प्या. 

कोकम सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोकमच्या साली घ्यायच्या.  आमसुल नाही , कोकमाची सालच. आमसुल चवीला अगदी वेगळे असते. अर्धा ते एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवाव्यात. त्यामुळे त्यांचा रंग आणि चव पाण्यात उतरते. भिजल्यानंतर त्या साली  हाताने कुस्करा आणि त्याचा रस काढा रस थोडा वेळ तसाच ठेवायचा. नंतर गाळून घ्या. या रसात चवीनुसार साखर किंवा गूळ मिसळून पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळावे. नंतर चिमूटभर मीठ आणि हवे असल्यास थोडी जिरे पूड घाला. शेवटी थंड पाणी घालून सरबत तयार करावे. सर्व्ह करताना त्यात बर्फाचे तुकडे घातल्यास चव अधिक खुलते. काही जण यात पुदिन्याची पाने किंवा थोडे काळे मीठही घालतात, ज्यामुळे सरबत अधिक रुचकर लागते.

कोकम सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोकममध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. हे पचनासाठीही अतिशय उपयुक्त आहे. जड अन्न खाल्ल्यानंतर कोकम सरबत घेतल्यास पोट हलके वाटते आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. कोकममध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. तसेच हे पेय डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते आणि घामामुळे कमी झालेली ऊर्जा परत मिळवून देते. काही लोकांना भूक न लागण्याचा त्रास असल्यास कोकम सरबत भूक वाढवण्यासही मदत करु शकते.

कोकम सरबत दुपारच्या वेळी किंवा उन्हातून घरी आल्यानंतर पिणे विशेष फायदेशीर ठरते. मात्र अतिप्रमाणात साखर घालणे टाळावे आणि मधुमेह असणाऱ्यांनी गुळाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. नेहमी शक्यतो ताजे सरबत बनवून पिणे अधिक चांगले.

एकूणच, कोकम सरबत हे फक्त तहान भागवणारे पेय नाही, तर उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवणारा आणि पचनाला मदत करणारा पारंपरिक, आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात कृत्रिम थंड पेयांऐवजी घरच्या घरी तयार केलेले कोकम सरबत नक्कीच प्या.

Web Title: Store-bought kokum syrup is just sugar syrup - see How to make kokum extract at home