दही मिरची हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे. दह्यातली मिरची भाकरीसोबत खातात तसेच भाताशीही अगदी भारी लागते. (Steamed curd chilies that last for 10 days are very easy to make, crispy, spicy and delicious.)हा पदार्थ करायची पद्धत घरोघरी वेगळीच. मिरची परतून किंवा ठेचून केली जातेच पण कधी वाफवून केली आहे का? वाफवलेली दही मिरची करायला अगदीच ,सोपी आहे. कमी सामग्रीत करता येते. एखादा दिवस भातावर वरणाऐवजी किंवा आमटीऐवजी दह्यातली मिरची घ्यायची. तसेच भाजीपेक्षा वेगळा पदार्थ म्हणून नक्कीच करु शकता. एकदा केली की किमान दहा दिवस तरी ही मिरची मस्त टिकते. खराब होत नाही. हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
साहित्य
हिरवी मिरची, दही, तेल, मोहरी, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे, आलं, लसूण, हिंग, कोथिंबीर
कृती
१. हिरवी मिरची छान स्वच्छ धुवायची. मध्यम तिखट मिरची घ्या. धुतल्यावर एका कोरड्या कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायची. सुकी करुन घ्या. नंतर मिरचीला मधोमध कट द्यायचा. देठ काढून घ्या आणि टोकापर्यंत कापून घ्या. तुकडा पाडू नका. अख्खीच ठेवायची. सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या मग त्यात मीठ भरायचे. मीठ भरून झाल्यावर मिरची इडली पात्रात व्यवस्थित लावून घ्यायची आणि झाकून टाकायची. जरा दहा मिनिटे वाफवून घ्या. मिरची मस्त मऊ होईल.
२. एका कढईत तेल घ्यायचे. (Steamed curd chilies that last for 10 days are very easy to make, crispy, spicy and delicious.)जरा गरम झाले की भरपूर मोहरी फोडणीस टाकायची. मोहरी छान तडतडू द्यायची. मग त्यात जिरे घालायचे. जिरे फुलले की त्यात हिंग घालायचे. मस्त बारीक चिरलेला लसूण घालायचा. किसलेले आले घालायचे. आलं लसूण छान परतून घ्यायचे. मग त्यात वाफवलेली मिरची घायायची आणि पाच मिनिटे झाकण ठेऊन शिजवून घ्यायची.
३. पाच मिनिटांनी त्यात मस्त गोड असे दही घालायचे. गॅस मंद ठेवायचा. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. सतत ढवळायचे नाही तर दही फाटते. त्यात चमचाभर लाल तिखट घाला. नाही घातले तरी चालेल. शिवाय जास्त तिखट आवडत नसेल किंवा पचत नसेल तर त्यात चमचाभर साखरही घालू शकता. व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.