भाजी, पोळी किंवा भाकरी, आमटी, भात असे पदार्थ जेवणात असले तरी तोंडी लावायला एखादा पदार्थ लागतोच. त्याशिवाय जेवण कसं पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. आता मराठी माणसांच्या घरात तोंडी लावण्यासाठी हमखास घेतला जाणारा एक पदार्थ म्हणजे मिरच्यांचा झणझणीत ठेचा. ठेचा जर जेवणात असेल तर अगदी साध्या जेवणालाही छान चव येते. काही तरी खमंग खाल्ल्यासारखं वाटतं. आता तुम्हीही ठेचाप्रिय असाल तर पुढील रेसिपीमध्ये सांगितलेली मिरच्यांची चटणीही तुम्हाला नक्कीच आवडू शकते (spicy tasty chutney of boiled green chilli). ती कशी करायची ते पाहा..(how to make green chili chutney?)
उकडलेल्या हिरव्या मिरच्यांची चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१५ ते २० हिरव्या मिरच्या
८ ते १० लसूण पाकळ्या
चिमूटभर हिंग
१ टीस्पून जिरे
चहा, कॉफी आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? कोणत्या वेळी काय प्यावं, वाचा खास माहिती
१ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
अर्ध्या लिंबाचा रस
१ चमचा तेल
कृती
हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना आपण त्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतो. पण इथे मात्र चटणी करण्यासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा.
फक्त १ तासांत करा अख्ख्या घराची स्वच्छता! दसऱ्यासाठी घर होईल चकाचक, थकवाही येणार नाही
त्यामध्ये हिरव्या मिरच्या सोडा आणि ८ ते १० मिनिटांसाठी त्या चांगल्या उकळून घ्या.
त्यानंतर उरलेलं पाणी काढून घ्या. मिरच्यांमधलं पाणी व्यवस्थित निथळून जाऊ द्या आणि त्यानंतर त्या खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्या. मिरच्यांप्रमाणेच लसणाच्या पाकळ्याही ठेचून घ्या.
आता गॅसवर छोटी कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आणि कुटलेल्या मिरच्या एकत्रच कढईत घालून परतून घ्या.
कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ पदार्थ रोजच खा, कॅन्सर सेल्सची वाढही होईल कमी
यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालून ते ही परतून घ्या. सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर त्यात लिंबू पिळा. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी झाली तयार..