उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो, अशावेळी आपल्याला सतत काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. सहसा आपण यावेळी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पितोच पण जर त्याच कोकमला थोडा स्पाईसी आणि नवीन टच दिला तर त्याची चव दुप्पट होते. कोकम पिकांते किंवा कोकम मॉकटेल हे केवळ दिसायला आकर्षक नसते, तर ते पिणाऱ्याला झटपट ताजेतवाने (Refresh) करते. कोकममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते पचनासाठीही उत्तम मानले जाते.अनेकदा उन्हामुळे पित्ताचा त्रास किंवा अन्नावरचा वास उडतो, अशावेळी कोमकमधील आंबटपणा आणि त्यात घातलेले तिखट-मिठ जिभेची चव परत आणतात. हे ड्रिंक बनवायला अत्यंत सोपे आहे. हॉटेल किंवा कॅफेमध्ये मिळणारे महागडे मॉकटेल आपण घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत तयार करू शकतो. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा दुपारच्या कडक उन्हात स्वतःला थंडावा देण्यासाठी हे कूल-स्पाईसी कोकम मॉकटेल कसं बनवायचं.
साहित्य
कोकम ज्यूस किंवा सिरप - ३० मिली मध - ३० मिलीलाल मिरची - बारीक तुकडे केलेली लिंबाची पाने - ३तुळशीची पाने - ३कोथिंबीर - थोडीशीलिंबाचा रस - अर्धा चमचासोडा बर्फ - भरपूर ग्लासच्या कडेला लावण्यासाठी- मीठ, पिठीसाखर आणि मिरची पावडरचे मिश्रण
कृती
1. सगळ्यात एका भांड्यात लिंबाची पाने, कोथिंबीर, लाल मिरचीचे बारीक तुकडे आणि तुळशीची पाने एकत्र करुन हलके क्रश करुन घ्या.
2. आता एका शेकरमध्ये लिंबाचा रस, मध, कोकम सिरप आणि बर्फ घालून सर्व साहित्य शेक करुन घ्या.
3. सर्व्हिंग ग्लासच्या कडांना लिंबू फिरवा. नंतर त्यावर मीठ, साखर आणि मिरचीच्या मिश्रणात बुडवून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचे घाला. आता त्यात कोकमचे तयार मिश्रण गाळणीने गाळून ग्लासात ओता. त्यात वरुन सोडा ओता. मिरची आणि कोथिंबीर लावून सजवून थंडगार सर्व्ह करा.
Web Summary : This summer, try a refreshing and spicy Kokum mocktail. It's easy to make in just 10 minutes. Kokum aids digestion and offers a tangy, spicy twist to beat the heat and refresh you instantly. A perfect summer cooler!
Web Summary : इस गर्मी में, ताज़ा और मसालेदार कोकम मॉकटेल आज़माएं। यह सिर्फ 10 मिनट में बनाना आसान है। कोकम पाचन में सहायक है और गर्मी को मात देने और तुरंत ताज़ा करने के लिए एक तीखा, मसालेदार स्वाद प्रदान करता है। एक उत्तम समर कूलर!