Lokmat Sakhi >Food > Maharashtra monsoon food : करा खमंग कोथिंबीर पराठा, फक्त १० मिनिटांत करा नाश्त्याचा पोटभरीचा मस्त पदार्थ

Maharashtra monsoon food : करा खमंग कोथिंबीर पराठा, फक्त १० मिनिटांत करा नाश्त्याचा पोटभरीचा मस्त पदार्थ

Spicy Coriander Paratha - Make breakfast with minimal ingredients, just ten minutes of work, tasty food : करायला सोपा आणि चवीला मस्त. कोथिंंबीर पराठा म्हणजे एकदम भारी नाश्ता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:50 IST2025-06-28T18:12:06+5:302025-06-30T16:50:56+5:30

Spicy Coriander Paratha - Make breakfast with minimal ingredients, just ten minutes of work, tasty food : करायला सोपा आणि चवीला मस्त. कोथिंंबीर पराठा म्हणजे एकदम भारी नाश्ता.

Spicy Coriander Paratha - Make breakfast with minimal ingredients, just ten minutes of work, tasty food | Maharashtra monsoon food : करा खमंग कोथिंबीर पराठा, फक्त १० मिनिटांत करा नाश्त्याचा पोटभरीचा मस्त पदार्थ

Maharashtra monsoon food : करा खमंग कोथिंबीर पराठा, फक्त १० मिनिटांत करा नाश्त्याचा पोटभरीचा मस्त पदार्थ

पराठा हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहे. नाश्ता , जेवण दोन्ही वेळी पराठा आवडीने खाल्ला जातो. अनेक प्रकारचे पराठे करता येतात. (Spicy Coriander Paratha - Make breakfast with minimal ingredients, just ten minutes of work, tasty food)करायला अगदी सोपा असा हा प्रकार आहे. कोथिंबीर आरोग्यासाठी फार पौष्टिक असते. कोथिंबीरीचा पराठा कधी खाल्ला आहे का? हा पदार्थ चवीला मस्त असतो आणि करायला सोपा आहे. पाहा कसा करायचा.  

साहित्य 
कोथिंबीर, पाणी, हिरवी मिरची, आलं, गव्हाचे पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, धणे पूड, ओवा, जिरे, तेल/ तूप, लसूण 

 

कृती
१. छान ताजी कोथिंबीरीची जुडी घेऊन या. व्यवस्थित धुवा. निवडून घ्या आणि मग बारीक चिरुन घ्या. इतर पदार्थात आपण कोथिंबीर अगदी थोडी टाकतो. पण या पराठ्यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर बारीक चिरुन झाल्यावर एका परातीत घ्यायची. 

२. आल्याचा तुकडा किसून घ्यायचे. तसेच लसूण सोलायचा आणि लसणाच्या काही पाकळ्या किसायच्या. किसलेलं आलं आणि किसलेला लसूण कोथिंबीरीत घालायचा. त्यात चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीरीत घालायचे. चमचाभर धणे पूड घालायची. तसेच हातावर ओवा मळायचा आणि ओवाही त्यात घालायचा. 

३. सगळे पदार्थ मिक्स करायचे आणि नंतर त्यात गरजे पुरते गव्हाचे पीठ घ्यायचे. पराठ्यासाठी जसे पीठ मळता अगदी तसेच सैलसर पीठ मळून घ्यायचे. गोळे लाटता आले पाहिजे. त्यानुसार पीठ मळायचे. पीठ छान मळून झाल्यावर त्यात चवी पुरते मीठ घालायचे. वरतून गरम तेल घालायचे आणि पुन्हा छान मळायचे. म्हणजे पीठ सेट होते. 

४. पोळपाटाला सुकी कणिक लावायची आणि नंतर लाटी लाटून घ्यायची. पातळ छान पोळी लाटायची. तवा गरम करत ठेवायचा. तवा तापल्यावर त्यावर तेल किंवा तूप सोडायचे आणि त्यावर लाटलेला पराठा घालायचा आणि परतायचा. दोन्ही बाजूनी छान खमंग परतायचा आणि मग गरमागरम खायचा. 

Web Title: Spicy Coriander Paratha - Make breakfast with minimal ingredients, just ten minutes of work, tasty food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.