चहा (Milk Tea) भारतीय लोकांसाठी ड्रिंकच नाही तर एक इमोशनल फिलिंग आहे. सकाळची सुरूवात असो किंवा संध्याकाळचा थकवा घालवणं असो एक कप चहा सगळं काही ठीक करतो. चहा करण्यासाठी आपण पातेलं वापरतो पण काहीजण कुकरमध्येही चहा करतात. कुकरमध्ये चहा करणं हे ऐकायला इंटरेस्टींग वाटतं तितकंच करायलाही आहे. (Special recipe for making tea in a pressure cooker)
अलिकडेच इंस्टाग्रामवर कुकींग, शुकिंग नावाच्या एका पेजवर अशीच एक रेसिपी शेअर केली आहे. ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. या रेसिपीची खासियत अशी की चहा प्रेशर कुकरमध्ये केला जात आहे. ज्याची चव आणि टेक्स्चर दोन्ही वेगवेगळे आहेत. या रेसिपीची पूर्ण प्रक्रिया आणि या मागचे काही फॅक्ट्स समजून घेऊ. (How To Make Tea in A Pressure Cooker)
कुकरमध्ये चहा करण्यासाठी लागणारं साहित्य
अर्धा कप पाणी
दीड कप दूध
वाटलेलं आलं
तीन चमचे साखर
एक ते दीड चमचा चहा पावडर
सर्व पदार्थ प्रेशर कुकरमध्ये एकत्र घाला. कुकरचं झाकण बंद करा आणि मध्यम आचेवर फक्त २ शिट्या येईपर्यंत शिजवून घ्या.जास्त शिट्ट्या घेतल्यास चहा खूपच जास्त कडक होऊ शकतो. जो प्रत्येकालाच आवडेल असं नाही. कुककरच्या २ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि ३ ते ४ मिनिटं थंड होऊ द्या. नंतर हळूहळू कुकरचं झाकण उघडा आणि चहा कपात गाळून घ्या. कुकर उघडण्याची घाई करू नका. कारण आतलं प्रेशर अचानक निघू शकतं.
प्रेशर कुकरमध्ये तयार केल्या जाणाऱ्या चहात सर्व पदार्थ एकदम व्यवस्थित उकळले जातात ज्याची चव उत्तम लागते. या पद्धतीमुळे वेळेची बचत होते आणि चहा लवकर तयार होतो. कुकरमध्ये बंद केल्यामुळे आलं आणि चहा पावडरचा सुगंध पूर्णपणे चहात उतरतो. पण कुकरच्या २ पेक्षा जास्त शिट्या घेऊ नका. अन्यथा चहा खूपच स्ट्राँग होऊ शकतो. कुकर उघडताना सावधगिरी बाळगा जेणेकरून वाफेमुळे जळण्याचा धोका नसेल. जर तुम्हाला मसाला चहा प्यायला आवडत असेल तर वेलची आणि लवंगही घालू शकता पण याचे प्रमाण संतुलित ठेवा.
