Join us

तडतड्या -मस्तीखोर लहान मुलांसाठी खास नाचणी-डिंकाचे लाडू! किडकिडीत मुलंही होतील गुटगुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 15:25 IST

Nachni dinkache ladoo : Healthy ladoo for kids weight gain: ladoo recipe: मुलांसाठी नाचणी आणि डिंकाचे लाडू कसे बनवायचे पाहूया रेसिपी.

नाचणी डिंकाचे लाडू हे शरीरासाठी पौष्टिक, आरोग्यवर्धक आहेत.(ladoo recipe for kids) लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांसाठी उपयुक्त आहेत.(Healthy ladoo for kids weight gain) लहान मुलांना पालेभाज्या किंवा इतर पौष्टिक पदार्थ खायला आवडत नाही.(Nachni dinkache ladoo) त्यांना सतत चॉकलेट किंवा जंक फूड खायला आवडतात. अशावेळी आपण मुलांसाठी पौष्टिक नाचणी डिंकाचे लाडू करु शकतो.(Nachni dinkache ladoo for toddlers) नाचणी आणि डिंक मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. यात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे मुलांच्या वाढीसाठी चांगले आहे. यामुळे मुलांची हाडे आणि दात मजबूत होतात. पचनक्रिया सुधारते आणि दिवसभर त्यांना एनर्जी मिळते. यात असणारे कॅल्शियम मुलांचे वजन वाढवण्यास मदत करतात. नाचणी आणि डिंकाचे लाडू कसे बनवायचे पाहूया रेसिपी. 

Maharashtrian Food : भाजलेल्या लसणाची चटणी खाऊन तर पाहा, अशी झणझणीत की खातच राहाल- करा फक्त १० मिनिटांत!

साहित्य 

तूप - ४ मोठे चमचेमखाणे - १ वाटी डिंक - १/२ वाटी काजू - ५ बदाम - ७ ते ८अक्रोड - ३ ते ४मनुके - १० ते १२पिस्ते - ४ ते ५नाचणीचे पीठ - १ वाटी बारीक चिरलेला गूळ - दीड वाटी वेलची पूड - १/४ चमचा खारीक पावडर - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी कढई गरम करुन त्यात तूप घाला. आता मखाणे भाजून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स भाजून घ्या. कढईमध्ये पुन्हा तूप घेईन डिंक व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्या. तळलेला डिंक टिश्यू पेपरवर काढून घ्या. 

2. त्याच कढईत चमचाभर तूप गरम करुन त्यात नाचणीचे पीठ टाका. मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे किंवा पीठ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. 

3. एका पॅनमध्ये तूप,  अर्धी वाटी गूळ आणि १ ते २ चमचे पाणी घालून मंद आचेवर वितळवून घ्या. गुळाचा एक तारी पाक झाल्यावर गॅस बंद करा. 

4. आता मिक्सरच्या भांड्यात डिंक, ड्रायफ्रुट्स, मखाणे आणि वेलची पूड घालून पावडर करुन घ्या. त्यानंतर नाचणीचे पीठ, डिंकाची पावडर, गूळ पावडर आणि गूळाचा पाक घाला. हवे असल्यास आपण यात खारीक पावडरही घालू शकतो. 

5. पीठ व्यवस्थित मिक्स करुन त्याचे लाडू वळवा. मुले आवडीने खातील आणि भरपूर पोषणतत्व मिळेल. 

टॅग्स :अन्नपाककृतीलहान मुलं