Join us

महिलांसाठी खास लाडू, एक लाडू खा पाळीच्या दिवसातील थकवा जातो-हार्मोनल त्रासही होतो कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 16:19 IST

Special laddus for women, eat one laddu, fatigue during menstruation goes away - hormonal problems also reduce : हे लाडू महिलांसाठी अगदी खास आहेत. प्रत्येकीने खायलाच हवेत.

काही पदार्थ असे असतात जे महिलांसाठी फार पौष्टिक ठरतात. घरी ते कायम असावेत. (Special laddus for women, eat one laddu, fatigue during menstruation goes away - hormonal problems also reduce)करायलाही सोपे असतात आणि चवीलाही छान असतात. महिलांमध्ये अत्यंत कॉमन अशी समस्या म्हणजे हार्मोनल असंतुलन. हार्मोनल बदल महिलांमध्ये सतत होत असतात. त्याचे काही वाईट परिणाम होतात. थकवा जाणवतो. पाळी पुढे-मागे होत राहते. पण काही पदार्थ असतात जे संतुलन कायम ठेवण्यासाठी मदत करतात. अशाच काही पौष्टिक पदार्थांचे मिश्रण करुन हा पौष्टिक लाडू तयार करा. आरोग्यासाठी अगदीच फायद्याचा ठरेल. रोज एक खायचा पुरेसा आहे. 

ही लाडूची रेसिपी  महिलांसाठी खास आहे. हार्मोनल बदल होताना शरीराला त्रास होतो. त्यामुळे मानसिक ताणही येतो. (Special laddus for women, eat one laddu, fatigue during menstruation goes away - hormonal problems also reduce)मात्र हे लाडू हार्मोनल बदल होत असताना, शरीराला आधार देतात. क्रिया चांगली आणि योग्य व्हावी यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात.  

साहित्य:सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, अक्रोड, जवस, पांढरे तीळ, खजूर 

प्रमाणएक वाटीभर लाल भोपळ्याच्या बिया घेतल्या तर एक वाटी सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या. अर्धी वाटी अक्रोड घ्यायचे. अर्धी वाटी जवस घ्यायचे. अर्धी वाटी पांढरे तीळ घ्यायचे. आठ ते नऊ खजूर घ्यायचे. 

कृती१. एक वाटीभर लाल भोपळ्याच्या बिया मिक्सरमधून वाटून घ्यायच्या. नंतर वाटीभर सूर्यफुलाच्या बिया वाटून घ्यायच्या अगदी बारीक करायच्या नाहीत. जरा जाडसर वाटायचे. पांढरे तीळही जाडसर वाटून घ्यायचे. खजूराच्या बिया काढून घ्यायच्या गर बाजूला करायचा. 

२. मिक्सरच्या भांड्यात खजूर घ्यायचे. त्यात वाटलेल्या बिया घालायच्या. सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या तसेच लाल भोपळ्याच्या बियाही घ्यायच्या. त्यात वाटलेले जवस घ्यायचे. तसेच अक्रोड घ्यायचे. पांढरे तीळ घ्यायचे. सगळ्या गोष्टी एकदा पुन्हा एकत्र वाटायच्या. जरा जास्त वेळ वाटा म्हणजे त्याचा लाडू वळता येईल. 

३. वाटून झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्यायचे. लहान-लहान लाडू वळायचे. मोठे लाडू वळू नका. जास्त प्रमाणात हे लाडू खाणे उष्ण ठरेल. आरोग्यासाठी चांगले ठरतील एवढ्याच प्रमाणात हे लाडू खायचे.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.