भारतात असे अनेक राज्य आहेत जिथे विविध पदार्थांची चव चाखली जाते. त्यातील एक दक्षिण भारत.(South Indian traditional dishes) दक्षिण भारतात असे अनेक पदार्थ आहे जे आपण आवडीने खातो.(How to make Tambuli) याला खाद्यसंस्कृतीचे माहेरघर म्हटले जाते.(Tadka dahi recipe) साऊथ इंडियन पदार्थांमध्ये डोसा, इडली, उत्तप्पा, वडा-सांबार यांसारखे पदार्थ आपण नेहमी खातो. (South Indian cucumber curry)
साऊथ इंडियन पदार्थांमध्ये असे अनेक खास पारंपरिक पदार्थ आहेत जे आजही खाल्ले जातात.(Healthy South Indian recipes) त्यातील एक दही तडका अर्थात काकडीची तांबळी. हा पदार्थ कर्नाटकमध्ये बनवला जाते. याला विविध पद्धतीने बनवले जाते. थंप्पू म्हणजे थंड आणि हुली म्हणजे करी.(Cucumber curd curry recipe) काकडीची तांबळी ही भातासोबत कर्नाटकात खाल्ली जाते.(Step-by-step cucumber tambali recipe) तर काही ठिकाणी याला डोसासोबत खातात. आपल्यालाही काही नवीन ट्राय करायचे असेल तर काकडीची तांबळी नक्की ट्राय करुन बघा, पाहूया रेसिपी. (Cooling cucumber yogurt curry)
साहित्य
चिरलेली काकडी - १
काळी मिरी - १/४ चमचा
जिरे - १/२ चमचा
तीळ - १/२ चमचा
लाल मिरची - २
लसूण - ३
ओले खोबरे - १/३ कप
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
तेल - १ चमचा
सुकलेल्या लाल मिरच्या - २ ते ३
मोहरी - १/२ चमचा
कढीपत्त्याची पाने - ७ ते ८
दही - १ कप
कृती
1. सगळ्यात आधी काकडी सोलून त्याचे बारीक तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, तीळ, काळीमिरी, लसूण, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, कोथिंबीर आणि काकडीचे तुकडे घालून वाटून घ्या.
2. एका भांड्यात दही घालून त्यात थोडे पाणी घाला. यात वाटलेले मिश्रण घालून चांगले ढवळून घ्या. वरुन मीठ घालून पुन्हा ढवळून घ्या.
3. फोडणी देण्यासाठी तेल गरम करुन त्यात जिरे, मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
4. तयार फोडणी काकडीच्या मिश्रणात घाला. चांगले ढवळून घ्या. भातासोबत आवडीने खा काकडीची तांबळी.