इडली सांबार, वडा सांबार हे पदार्थ आता फक्त दक्षिण भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता सगळ्या भारतातच आवडीने खाल्ले जातात. गरमागरम सांबार आणि इडल्या किंवा मेदूवडे हे पदार्थ जर सकाळी नाश्त्यामध्ये मिळाले तर अख्खा दिवसच भन्नाट जातो. पण त्यासाठी अस्सल साऊथ इंडियन चवीचा सांबार करणं मात्र जमायला हवं. आता काही जण साऊथ इंडियन चवीचा सांबार करायचा म्हणजे त्यात खूप वेगवेगळे मसाले घालतात. पण असं केल्याने त्याची चव मात्र पुरती बिघडून जाते (easy and simple sambar recipe). म्हणूनच ही एक अतिशय सोपी रेसिपी पाहा (south indian style sambar recipe). या रेसिपीने सांबार केला तर तो अगदी झटपट आणि खूप चवदार होईल.(how to make sambar?)
सांबार करण्याची सोपी रेसिपी
साहित्य
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद आणि चिमूटभर हिंग
कडिपत्ता आणि वाळलेल्या लाल मिरच्या
१ वाटी लाल भोपळ्याचा गर
दोन वाट्या शिजवलेली तूर आणि मसूर डाळ
चिंचेचा कोळ आणि गूळ
चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि सांबार मसाला
१ वाटी दुधी भोपळ्याचे काप आणि शेवग्याच्या शेंगांचे काप
कृती
सगळ्यात आधी तर तूर डाळ आणि मसूर डाळ एकत्र करून २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर शिजवून घ्या.
काय केलं तर केस वाढतील झरझर? जावेद हबीब सांगतात केस वाढवण्यासाठी २ उपाय, ३० दिवसात फरक
यानंतर कढई गरम करायला ठेवा. तेल घालून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्या. यानंतर त्यामध्ये लाल भोपळ्याचा मिक्सरमधून बारीक केलेला गर घाला. तो एखादा मिनिट चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि सांबार मसाला घाला.
यानंतर त्यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि दुधी भोपळ्याचे काप घालून ते देखील परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शिजवलेल्या डाळी, चिंचेचं पाणी घालून गरजेनुसार पाणी घालून सांबार पातळ करून घ्या.
घरात बोअरिंग गाऊन घालण्यापेक्षा ट्राय करा स्टायलिश कफ्तान गाऊन, ७ स्मार्ट प्रकार, दिसाल आकर्षक
सगळ्यात शेवटी गूळ आणि चवीनुसार मीठ घालून सांबारला उकळी येऊ द्या. त्यानंतर पुन्हा एका छोट्या कढईमध्ये लाल मिरच्या आणि कडिपत्ता घालून फोडणी करा आणि ती सांबारमध्ये वरतून घाला. मस्त चवदार सांबार तयार..
