Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > इडलीची खरी दोस्त अस्सल साऊथ इंडियन नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

इडलीची खरी दोस्त अस्सल साऊथ इंडियन नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

South Indian Special Neer Chutney Recipe: उडपी हॉटेलमध्ये इडलीसोबत मिळते तशी अस्सल साऊथ इंडियन स्टाईल नीर चटणी घरी करायची असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा..(how to make neer chutney with idli?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 14:38 IST2026-01-30T14:16:25+5:302026-01-30T14:38:29+5:30

South Indian Special Neer Chutney Recipe: उडपी हॉटेलमध्ये इडलीसोबत मिळते तशी अस्सल साऊथ इंडियन स्टाईल नीर चटणी घरी करायची असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा..(how to make neer chutney with idli?)

south Indian special neer chutney recipe, how to make neer chutney with idli, Udupi style south Indian neer chutney recipe  | इडलीची खरी दोस्त अस्सल साऊथ इंडियन नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

इडलीची खरी दोस्त अस्सल साऊथ इंडियन नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

Highlightsया चटणीसोबत एकदा इडली खाऊन पाहा. चव अशी भारी होईल की तुम्हाला सांबारचीही आठवण येणार नाही. 

इडली हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. बऱ्याचदा असं होतं की नाश्त्याला इडलीचा बेत आखला जातो. पण सांबार करण्याएवढा वेळच मिळत नाही. मग अशावेळी झटपट चटणी केली जाते आणि इडली चटणीवर ताव मारला जातो. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की दक्षिणेत किंवा उडपी हॉटेलमध्ये जशी हिरवी चटणी मिळते, तशी चव काही घरच्या चटणीला येत नाही. असं तुमचंही म्हणणं असेल तर पुढे सांगितलेली नीर चटणी रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (South Indian Special Neer Chutney Recipe). ही चटणी अतिशय चवदार होते आणि शिवाय ती करण्यासाठी खूप काही तयारी करण्याची गरजही नसते.(how to make neer chutney with idli?)

इडलीसोबत खाण्यासाठी नीर चटणी रेसिपी 

 

साहित्य

अर्धी वाटी डाळवं

अर्धी वाटी नारळाचे काप

पाव वाटी भाजलेले शेंगदाणे

३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि २ ते ३ लसूण पाकळ्या

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता आणि उडीद डाळ

 

कृती

नीर चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे थोडे भाजून घ्या आणि त्यांची सालं काढून घ्या.

यानंतर मिक्सरच्या भांड्याामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, डाळवं, नारळाचे काप , लसूण, भाजलेले शेंगदाणे असं सगळं घाला आणि अगदी बारीक चटणी वाटून घ्या.

यानंतर त्यात थोडं पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा सगळं मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालून वरतून मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता आणि उडीद डाळ यांची कडकडीत फोडणी घाला. नीर चटणी झाली तयार. या चटणीसोबत एकदा इडली खाऊन पाहा. चव अशी भारी होईल की तुम्हाला सांबारचीही आठवण येणार नाही. 


 

Web Title : इडली के साथ असली साउथ इंडियन नीर चटनी, सांभर की भी ज़रूरत नहीं!

Web Summary : घर पर आसानी से स्वादिष्ट साउथ इंडियन नीर चटनी बनाएं और इडली के साथ आनंद लें। इस रेसिपी में भुनी हुई मूंगफली, नारियल और दाल का उपयोग किया जाता है। प्रामाणिक स्वाद के लिए राई, करी पत्ते और मसालों से तड़का लगाएं।

Web Title : South Indian Neer Chutney: Perfect with Idli, No Sambar Needed!

Web Summary : Make delicious South Indian Neer Chutney easily at home to enjoy with idli. This recipe uses roasted peanuts, coconut, and lentils. Temper with mustard, curry leaves and spices for an authentic taste that rivals Udupi restaurants.