Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सोहा अली खानने शेअर केली सूप रेसिपी- हाडं बळकट होण्यासाठी प्रत्येकीने प्यायलाच हवं खास सूप 

सोहा अली खानने शेअर केली सूप रेसिपी- हाडं बळकट होण्यासाठी प्रत्येकीने प्यायलाच हवं खास सूप 

Soha Ali Khan Shared Soup Recipe: अभिनेत्री सोहा अली खान हिने एक खास सूप रेसिपी शेअर केली आहे. करायला सोपी आणि अतिशय पौष्टिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2026 09:35 IST2026-03-25T09:34:50+5:302026-03-25T09:35:01+5:30

Soha Ali Khan Shared Soup Recipe: अभिनेत्री सोहा अली खान हिने एक खास सूप रेसिपी शेअर केली आहे. करायला सोपी आणि अतिशय पौष्टिक...

soha ali khan shared soup recipe, healthy soup recipe shared by actress soha ali khan | सोहा अली खानने शेअर केली सूप रेसिपी- हाडं बळकट होण्यासाठी प्रत्येकीने प्यायलाच हवं खास सूप 

सोहा अली खानने शेअर केली सूप रेसिपी- हाडं बळकट होण्यासाठी प्रत्येकीने प्यायलाच हवं खास सूप 

Highlightsवाढत्या वयासोबत हाडं ठिसूळ होऊ द्यायची नसतील तर हे सूप नियमितपणे प्या.

अभिनेत्री सोहा अली खान तिच्या फिटनेस आणि डाएटच्या बाबतीत अतिशय जागरुक असते. तसाच प्रयत्न ती तिच्या चाहत्यांसाठीही करते. म्हणूनच सोशल मीडियावर नेहमीच डाएट आणि व्यायाम याविषयीच्या पोस्ट शेअर करते. आता सुद्धा तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने एका खास सूपची रेसिपी सांगितली आहे. सोहा म्हणते की तिच्या वयाच्या म्हणजेच साधारण पस्तिशीच्या पुढच्या महिलांनी हे सूप नेहमीच प्यायला हवं. कारण हे सूप आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, पण हाडांनी बळकटीही देतं. त्यामुळे वाढत्या वयासोबत हाडं ठिसूळ होऊ द्यायची नसतील तर हे सूप नियमितपणे प्या. हे सूप नेमकं कसं करायचं ते पाहा..(Soha Ali Khan Shared Soup Recipe)

 

सोहा अली खानने शेअर केलेली सूप रेसिपी

हे सूप तयार करण्यासाठी लाल भोपळा, दुधी भोपळा, गाजर, शेवगा, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो अशा सगळ्याच भाज्या लागणार आहेत. 

या भाज्यांसोबतच कोथिंबीर, पालक, लाल माठ अशा पालेभाज्याही घ्या. त्याचप्रमाणे भिजवलेले मूग, तेल किंवा तूप, जिरे, बडिशेप, धणे, मीठ, काळं मीठ असे मसालेही लागतील. 

डोकं खूप ठणकतंय? फ्रिजमधला बर्फाचा तुकडा घ्या आणि चटकन करा 'हा' उपाय- डोकेदुखी पळून जाईल

सगळ्यात आधी तर गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल किंवा बटर घाला. मोहरी, जिरे घालून फोडणी करून घ्या. त्यामध्ये मग कांदा, लसूण, आलं अशा भाज्या घालून परतून घ्या. यानंतर त्यामध्ये लाल भोपळा, दुधी भोपळा, गाजर, शेवगा, टोमॅटो अशा भाज्या बारीक चिरून घाला. त्या भाज्या परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या पालेभाज्या, भिजवलेले मूग घालावे.

 

त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी, चवीनुसार तिखट- मीठ घालून इतर मसाले घालावे. पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्या आणि शिट्टी होऊन भाज्या शिजवून घ्या.

शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय

शिजलेल्या भाज्या थंड झाल्या की मिक्सर किंवा ग्राईंडर वापरून बारीक करून घ्या. त्यात काळं मीठ, चाट मसाला घालून उकळून घ्या. मस्त सूप तयार. या सूपची चव आणखी खुलविण्यासाठी तुम्ही त्यात थोडं लिंबूही पिळू शकता. एकदा ट्राय करून पाहा. 


 

Web Title : सोहा अली खान ने साझा की हड्डी मजबूत करने वाली सूप रेसिपी।

Web Summary : सोहा अली खान ने 35 वर्ष से अधिक उम्र की महिलाओं के लिए फायदेमंद सूप रेसिपी साझा की। सूप में सब्जियां, पत्तेदार साग और मसाले शामिल हैं, जो हड्डियों को मजबूत बनाते हैं। लाल कद्दू, लौकी, गाजर, सहजन और टमाटर प्रमुख सामग्री हैं। यह सूप रेसिपी बनाने में आसान और स्वस्थ है।

Web Title : Soha Ali Khan shares soup recipe for strong bones.

Web Summary : Soha Ali Khan shared a soup recipe beneficial for women over 35. The soup includes vegetables, leafy greens, and spices, promoting bone strength. Red pumpkin, bottle gourd, carrot, drumstick, and tomato are key ingredients. This soup recipe is easy to make and healthy.