बेसन ढोकळा (Besan Dhokla) हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट आणि आरोग्यदायी गुजराथी पदार्थ आहे. महाराष्ट्रातही हा पदार्थ तितकाच आवडीनं खाल्ला जातो. घरोघरी नाश्त्याला बरेचजण ढोकळा खातात. घरी मऊ, जाळीदार, ढोकळा करणं ही एक सोपी कला आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणाच वापर केला तर मऊ, जाळीदार ढोकळा बनून तयार होईल. (How to Make Besan Dhokla At Home)
मऊ, जाळीदार बेसन ढोकळा करण्याची खास रेसिपी
ढोकळा करण्याासठी सगळ्यात आधी एक मोठ्या भांड्यात १ ते २ वाटी चाळलेलं बेसन घ्या. त्यात चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, चिमूटभर हळद आणि थोडं हिंग घाला. या मिश्रणात थोडं पाणी घालून ते नीट फेटून घ्या. पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
पिठाची सुसंगता मध्यम असावी. खूपच घट्ट किंवा खूपच पातळ नसावं. आता त्यात एक चमचा आलं, मिरचीची पेस्ट आणि लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा छान फेटून घ्या. तयार पीठ १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा.
दुसरीकडे गॅसवर स्टिमर किंवा मोठ्या टोपात पाणी उकळवायला ठेवा आणि ढोककळ्याच्या ताटाला तेलाचा हात लावून ग्रीस करून घ्या. पिठाला १५ मिनिटं झाल्यानंतर त्यात शेवटी एक पाकीट इनो किंवा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला. त्यावर थोडं पाणी घालून ते एकाच दिशेनं वेगानं फेटून घ्या. इनो घाल्यावर पीठ लगेच फुगालायला लागेल. वाट न पाहता हे पीठ तेल लावल्यानं ताटात ओला आणि स्टिमर मध्ये मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटं वाफवून घ्या.
आगरी पद्धतीची मऊसूत तांदळाची भाकरी करण्याच्या 7 ट्रिक्स; भाकरी संध्याकाळपर्यंत राहील मऊ
ढोकळा शिजला की नाही ते पाहण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून पाहू शकता. ती स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे. ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे चौकोनी काप करा. त्यात मोहोरी, जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि तीळ घालावेत. तयार फोडणी ढोकळ्यावर सम प्रमाणात पसरवा. वरून ताजी कोंथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस घाला. हा गरमागरम ढोकळा हिरवी चटणी किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करा.
