हिवाळा सुरू झाला की घरोघरी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, सुकामेव्याचे लाडू केले जातात. यातले बाकीचे लाडू आवडीने खाल्ले जातात. पण मेथीचे लाडू खाणं मात्र खूप जण टाळतात. पण या दिवसांत हाडांच्या मजबुतीसाठी मेथ्यांचे लाडू खाणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आता अशा काही टिप्स पाहा की जेणेकरून तुम्ही केलेला मेथीचा लाडू अजिबातच कडवट होणार नाही. आता मेथ्या आहेत म्हटल्यावर त्या लाडवांमध्ये हलकीशी कडू चव असणार. पण ते खाताना मात्र अजिबातच त्रासदायक ठरणार नाहीत. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..(winter special fenugreek laddu recipe)
मेथीच्या लाडूंची रेसिपी
पाव कप मेथी ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर हलक्याश्या भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि त्याची रवाळ पूड तयार करा. आता एका भांड्यात पाव कप तूप घ्या आणि त्यामध्ये मेथ्याची पूड मिक्स करा. त्यानंतर ते ८ ते १० तास झाकून ठेवा. यामुळे मेथ्यांचा कडवटपणा कमी होतो.
गालावरचे ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा थोराड दिसतो? 'या' पानांचा लेप लावा- त्वचा दिसेल तरुण, सुंदर
१०० ग्रॅम किसलेलं खोबरं भाजून घ्या. पाव कप साजूक तूप कढईमध्ये घालून गरम करून घ्या. त्यामध्ये १०० ग्रॅम काजू टाकून तळून घ्या. काजू तळून झाल्यानंतर १०० ग्रॅम अक्रोड आणि १०० ग्रॅम बदाम तसेच ५० ग्रॅम भोपळ्याच्या बिया घाला. हे सगळे पदार्थ तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्या. आता त्यामध्ये ५० ग्रॅम मनुका आणि थोडीशी खसखस घाला.
आता दुसऱ्या कढईत एक कप तूप गरम करायला ठेवा. त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून भाजून घ्या.
पाव कप डिंकाची पूड तयार करून घ्या आणि ती गव्हाच्या गरम पिठात टाकून थोडीशी वाफवून घ्या. यामुळे डिंक वेगळा तळून घेण्याची गरज नाही. आता भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ तळून घेतलेला सुकामेव्यामध्ये टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता या मिश्रणाची मिक्सरमधून रवाळ पावडर करून घ्या.
नाकावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ५ मिनिटांत हाेतील गायब, लगेच करा १ सोपा घरगुती उपाय
यानंतर अर्धा कप साजूक तूप गॅसवर कढईमध्ये गरम करायला ठेवा. त्यात दिड कप गूळ घालून वितळवून घ्या. आता हे गुळाचं पाणी आणि तुपामध्ये भिजवलेल्या मेथ्यांची पावडर सुकामेव्याच्या पावडरमध्ये घाला आणि त्याचे लाडू वळा. या पद्धतीने वळलेले लाडू अजिबात कडू होणार नाहीत.
