ढोकळा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. कित्येक जण नाश्त्यामध्ये किंवा मग सायंकाळी चहाच्या वेळी बऱ्याचदा ढोकळा करतात. ऐनवेळी पाहूणे येणार असं कळाल्यावर खमंग ढोकळ्याचा मेन्यू अगदी झटपट करता येतो. एरवी आपण बेसन म्हणजेच हरबरा डाळीचे पीठ वापरून ढोकळा करतो. पण त्यापेक्षा थोड्या वेगळ्या चवीचा आणि अतिशय सॉफ्ट, चवदार होणारा ढोकळा करायचा असेल तर डाळ- तांदळाचा ढोकळा करून पाहा. हा ढोकळाही अतिशय पौष्टिक असतो आणि शिवाय चवदार होतो.(how to make dhokla from dal and rice?)
डाळ- तांदळाचा ढोकळा कसा करायचा?
साहित्य
१ वाटी तांदूळ
अर्धी वाटी हरबरा डाळ
बेदाणे की मनुका- दोन्हीपैकी काय पौष्टिक असतं? तुमच्या तब्येतीसाठी काय जास्त चांगलं?
चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा
फोडीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, कडिपत्ता आणि कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती
डाळ आणि तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते ५ ते ६ तासासाठी भिजत घाला.
यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. त्यात हळद घाला आणि हे पीठ ७ ते ८ तासांसाठी आंबवायला ठेवून द्या.
फेशियल करूनही चेहरा काळवंडलेलाच दिसतो? ५ चुका टाळा, तरच ग्लो मिळून फेशियलचे पैसे होतील वसूल..
यानंतर पिठामध्ये थोडं तेल, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते ढोकळा पात्रात ठेवा. २० मिनिटे मंद ते मध्यम आचेवर गॅस राहू द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.
गरमागरम ढोकळा तयार. या ढोकळ्यावर नेहमीप्रमाणे फोडणी घाला. थोडी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घाला. गरमागरम, टम्म फुगलेला ढोकळा खाण्यासाठी तयार..
