Lokmat Sakhi >Food > न्यूट्रिशनिस्टनुसार चहासोबत कधीच खाऊ नये 'ही' गोष्ट, वजन वाढण्याचा असतो जास्त धोका!

न्यूट्रिशनिस्टनुसार चहासोबत कधीच खाऊ नये 'ही' गोष्ट, वजन वाढण्याचा असतो जास्त धोका!

Healthy Tips: न्यूट्रिशनिस्ट आशिमा अचंतानी यांनी सांगितलं की, चहासोबत खाल्ले जाणारे स्नॅक्स आरोग्यासाठी खूप जास्त घातक ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 10:40 IST2025-04-28T10:39:29+5:302025-04-28T10:40:44+5:30

Healthy Tips: न्यूट्रिशनिस्ट आशिमा अचंतानी यांनी सांगितलं की, चहासोबत खाल्ले जाणारे स्नॅक्स आरोग्यासाठी खूप जास्त घातक ठरतात.

Side effects of eating rusk with tea daily, you should know | न्यूट्रिशनिस्टनुसार चहासोबत कधीच खाऊ नये 'ही' गोष्ट, वजन वाढण्याचा असतो जास्त धोका!

न्यूट्रिशनिस्टनुसार चहासोबत कधीच खाऊ नये 'ही' गोष्ट, वजन वाढण्याचा असतो जास्त धोका!

Healthy Tips: सामान्यपणे सगळ्यात घरांमध्ये लहान मुले असो मोठे सगळेच सकाळी चहासोबत बिस्कीट, ब्रेड किंवा टोस्ट खातात. एकप्रकारे सगळ्यांना ही सवयच लागलेली असते. या गोष्टी खाल्ल्याशिवाय चहा  त्यांना चांगलाच लागत नाही. पण त्यांना हे माहीत नसतं आरोग्यासाठी चहा आणि त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टी खूप नुकसानकारक असतात. न्यूट्रिशनिस्ट आशिमा अचंतानी यांनी सांगितलं की, चहासोबत खाल्ले जाणारे स्नॅक्स आरोग्यासाठी खूप जास्त घातक ठरतात. अशात सकाळी चहासोबत काय खाणं टाळलं पाहिजे ते जाणून घेऊया.

चहासोबत काय खाऊ नये?

न्यूट्रिशिनिस्ट आशिमा अचंतानी यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बाजारात खुले टोस्टही मिळतात. दुकानात जाऊन लहान मुलं सकाळी दोन टोस्ट घेऊन येतात आणि चहासोबत खातात. इतकंच नाही तर लोक घरात खुले किंवा पॅकेटमधील टोस्ट स्टोर करून ठेवतात. जे ते सकाळी आणि सायंकाळी चहासोबत खातात. एक्सपर्ट सांगतात की, चहासोबत या गोष्टी खाल्ल्यानं वजन वाढण्याचा खूप जास्त धोका असतो. 

न्यूट्रिशिनस्टनुसार, रोज चहासोबत एक टोस्ट खाण्याचा अर्थ महिन्यातून जवळपास 38 चमचे साखर खाणं म्हणजेच 150 ग्रॅम साखर खाणं. अशात न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, चहासोबत या गोष्टी खाण्याऐवजी काही हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजे. ते काय हेही त्यांनी सांगितलं आहे.

चहासोबत काय खाऊ शकता?

चहासोबत नाश्त्यात खाखरा, बाजरा पफ, ज्वार पफ, चटणी आणि भाज्यांसोबतच पफ्ड राइस भेळ, स्प्राउट्स चाट, छोले चाट, कॉर्न चाट, मेथीचा थेपला इत्यादी गोष्टी खाऊ शकता.

चहासोबत टोस्ट खाण्याचे नुकसान

टोस्टमध्ये शुगर आणि ग्लूटन भरपूर असतं. ज्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ जास्त बिघडू शकते.

टोस्टमुळे ग्लूकोज लेव्हल असंतुलित होऊ शकते. ज्यामुळे आतड्यांवर सूज वाढू शकते.

तसेच नियमितपणे टोस्ट खाल्ल्यानं पचन तंत्रावरही खूप जास्त वाईट प्रभाव पडू शकते. ज्यामुळे हार्टबर्न आणि अॅसिडिटी (Acidity) ची समस्या होऊ शकते.

Web Title: Side effects of eating rusk with tea daily, you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.