Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक कॉफी पिणं फायदेशीरच, पण रात्री का पिऊ नये? पाहा असं केलं तर काय होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:26 IST

Black Coffee Side Effect : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, संध्याकाळनंतर कॉफी टाळावी. कारण त्या वेळेनंतर कॉफी शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.

Black Coffee Side Effect : चहासोबतच अनेकांना कॉफी पिण्याची देखील सवय असते. हल्ली तर कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. काही लोक दुधाची कॉफी पितात, तर काही लोक ब्लॅक कॉफी पितात. ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. कारण ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. आपणही अनेक कॉफी प्रेमींना पाहिलं असेल, जे दिवसभरात अनेक वेळा कॉफी पितात. काही लोक तर सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वीही कॉफी घेतात. पण रात्री कॉफी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, संध्याकाळनंतर कॉफी टाळावी. कारण त्या वेळेनंतर कॉफी शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.

रात्री ब्लॅक कॉफी पिण्याचे तोटे

झोपेवर परिणाम

कॉफीमध्ये असलेले कॅफीन मेंदूमधील एडेनोसाइन नावाच्या केमिकलला ब्लॉक करते. त्यामुळे झोप यायला उशीर लागतो किंवा झोप वारंवार खंडित होते. जरी तुम्ही झोपलात तरी ‘डीप स्लीप’ची गुणवत्ता कमी होते, त्यामुळे सकाळी थकवा जाणवतो.

चिंता आणि अस्वस्थता

रात्रीचा शांत वेळ अनेकदा ओव्हरथिंकिंगसाठी कारणीभूत ठरतो. अशावेळी कॅफीनमुळे हृदयाची धडधड वाढू शकते. यामुळे घाबरल्यासारखं वाटणं, हात-पाय थरथरणं आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

पचनाच्या समस्या

ब्लॅक कॉफीचा स्वभाव आम्लयुक्त असतो. रात्री किंवा रिकाम्या पोटी ती घेतल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ होऊ शकते. तसेच गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Black Coffee: Benefits, But Why Avoid It At Night?

Web Summary : Black coffee has benefits, but avoid it at night. Caffeine disrupts sleep, causes anxiety, and triggers digestive issues like acidity. Health experts advise against evening consumption.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स