Lokmat Sakhi >Food > श्रिया पिळगावकरने सांगितली मोदक करण्याची पिळगावकर कुटुंबाची पद्धत - सोशल मिडियावर झाला व्हिडिओ व्हायरल

श्रिया पिळगावकरने सांगितली मोदक करण्याची पिळगावकर कुटुंबाची पद्धत - सोशल मिडियावर झाला व्हिडिओ व्हायरल

Shriya Pilgaonkar shared the Pilgaonkar family's method of making Modak - the video went viral on social media : श्रिया पिळगावकरचा व्हायरल व्हिडिओ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 12:49 IST2025-09-05T12:48:27+5:302025-09-05T12:49:59+5:30

Shriya Pilgaonkar shared the Pilgaonkar family's method of making Modak - the video went viral on social media : श्रिया पिळगावकरचा व्हायरल व्हिडिओ.

Shriya Pilgaonkar shared the Pilgaonkar family's method of making Modak - the video went viral on social media | श्रिया पिळगावकरने सांगितली मोदक करण्याची पिळगावकर कुटुंबाची पद्धत - सोशल मिडियावर झाला व्हिडिओ व्हायरल

श्रिया पिळगावकरने सांगितली मोदक करण्याची पिळगावकर कुटुंबाची पद्धत - सोशल मिडियावर झाला व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगावकर सध्या फार चर्चेत असते. ओटीटी आणि बॉलिवूडमध्ये प्रियाला एक कौशल्यवान अभिनेत्री मानले जाते आणि तिचे चाहतेही भरपूर आहेत. (Shriya Pilgaonkar shared the Pilgaonkar family's method of making Modak - the video went viral on social media)मिर्झापूर या वेब सिरीजनंतर श्रियाला अनेक संधीही मिळाल्या आणि प्रेमही. सध्या श्रियाचे मोदक प्रेम सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. श्रियाने इंस्टाग्रामला पिळगावकरांकडे मोदक कसे केले जातात त्यांची पारंपरिक पद्धत कशी आहे हे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला. मोदक करण्यासाठी इतरांप्रमाणे साचा न वापरल्यासाठी श्रियाचे फार कौतुक नेटकऱ्यांनी केले.  

मोदक करण्यासाठी तांदळाची पिठी हाताने छान मळून घेतल्यावर त्याला गोल करण्यासाठी जुन्या पद्धतीचे यंत्र श्रियाने वापरले. मस्त सारण तयार केले आणि मोदक तयार करताना जाड पाऱ्या बोटांच्या मदतीने तयार केल्या शेवटी एका मोदकपात्रात कॉटनचा फडका ठेऊन त्यावर मोदक रचले आणि छान वाफवून घेतले. खरेतर महाराष्ट्रात घरोघरी याच पद्धतीने मोदक केले जातात. मात्र श्रियाच्या व्हिडिओचे लोकांना कौतुक वाटण्यामागे कारण हेच होते की आजकाल मोदक करण्यासाठी साचे आणि इतर यंत्र वापरली जातात. किंवा सरळ मोदक विकत आणतात. मात्र श्रियाच्या पोस्टमध्ये सगळा परिवार एकत्र बसून मोदक करताना दिसला. 

सणासुदीला सगळ्यांनी मिळून एकत्र स्वयंपाक करणे म्हणजे काम नसेल तर तो आनंद असतो. नात्यातील प्रेम वाढवणारा क्षण असतो. श्रियाच्या पोस्टवर अनेक कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. व्हिडिओच्या शेवटी श्रियाला मोदक फार आवडतो असे तिने सांगितले. सगळ्याच महाराष्ट्रीयांना  मोदक मनापासून आवडतो. मोदक या शब्दाचा संस्कृत अर्थ आनंद असा आहे. असे म्हणत श्रियाने मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ म्हणून त्याला हे नाव पडले असावे असे म्हटले. गणेशोत्सव आणि मोदक यांच्यात एक अतूट नाते आहे. दरवर्षी पिळगावकर परिवार अशाच पारंपरिक पद्धतीने मोदक तयार करते असे श्रियाने सांगितले.  

 


Web Title: Shriya Pilgaonkar shared the Pilgaonkar family's method of making Modak - the video went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.