lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : नेहमीच्या जेवणात आपल्याला तोंडी लावायला लागते त्याचप्रमाणे उपवासालाही असे तोंडी लावायला काही असले तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2023 05:55 PM2023-08-20T17:55:07+5:302023-08-21T11:55:37+5:30

Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : नेहमीच्या जेवणात आपल्याला तोंडी लावायला लागते त्याचप्रमाणे उपवासालाही असे तोंडी लावायला काही असले तर

Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : Khichdi, Vade are usual for Shravani Monday fast; Try potato-sweet potato crisps... | श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

श्रावणी सोमवार म्हणजे उपवासाचा वार. श्रावण महिन्यात सोमवार, शुक्रवार या दिवशी आवर्जून उपवास केले जातात. उपवास म्हटल्यावर आहारात बदल केले जातात आणि उपवासाचेच पदार्थ खाल्ले जातात. उपवास म्हटल्यावर साधापणपणे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याची भाजी, रताळ्याचा कीस किंवा राजगिऱ्याचे थालिपीठ असे काही ना काही केले जाते. सोमवारच्या उपवासाला वरई चालत नसल्याने इतर पर्याय केले जातात. पावसाळ्याच्या दिवसांत हवा गार असल्याने आपल्याला भूक लागते (Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe). 

अशावेळी वेगळे काहीतरी असेल तर आवडीने खाल्ले जाते. उपवासाचे पदार्थ घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असल्याने ते जास्तच करावे लागतात. मग नेहमीचे तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा थोडे वेगळे काही केले तर पोटही भरते आणि वेगळे खाल्ल्याचे समाधानही मिळते. इतकेच नाही तर नेहमीच्या जेवणात आपल्याला तोंडी लावायला लागते त्याचप्रमाणे उपवासालाही असे तोंडी लावायला काही असले तर जेवण चांगले जाते. घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासूनच करता येणारे असे बटाट्याचे आणि रताळ्याचे काप आज आपण पाहणार आहोत. एरवी आपण सुरण, केळी, वांगं याचे काप करतो आणि आवडीने खातो. आता उपवासाचे हे काप कसे करायचे पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. बटाटे - २ 

२. रताळी - पाव किलो

३. मीठ - चवीनुसार

४. तिखट - १ चमचा 

५. पिठीसाखर - १ चमचा 

६. राजगिरा पीठ - १ वाटी 

७. तेल - अर्धी वाटी

८. लिंबाचा रस - अवडीनुसार 

कृती -

१. बटाटा आणि रताळी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यायची.

२. दोन्हीचे गोलाकार एकसारखे काप करायचे, आवडीनुसार जाड-पातळ करु शकतो.

(Image : Google)
(Image : Google)

३. एका ताटलीत राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, पिठीसाखर घालावी. 

४. आवडीनुसार यामध्ये लिंबाचा रस पिळून हे मिश्रण एकजीव करावे.

५. बटाटा आणि रताळ्याचे काप यावर चांगले घोळवून घ्यावेत.

६. तव्यावर तेल घालून हे काप त्यावर ठेवावेत आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावेत.

७. बारीक गॅसवर वरती झाकण ठेवून हे काप चांगले शिजू द्यावेत म्हणजे कच्चे राहत नाहीत.

८. दोन्ही बाजुने चांगले कुरकुरीत झाल्यावर हे काप डीशमध्ये काढून खायला घ्यावेत.


 

Web Title: Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : Khichdi, Vade are usual for Shravani Monday fast; Try potato-sweet potato crisps...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.