श्रावण महिन्यांत एकापाठोपाठ एक सणांची रेलचेल सुरु होईल. सण - उत्सव म्हटलं की, पूजापाठ - व्रतवैकल्य ओघाने आलंच. श्रावणातील बऱ्याच सणांना आपल्यापैकी (Shravan Special Sabudana Rasmalai For Fasting) अनेकांचा उपवास असतो. उपवासाला घरोघरी वेगवेगळे उपवासाचे पदार्थ केले जातात. उपवासाच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने साबुदाण्याचा वापर फार (Easy Sabudana Rasmalai recipe for fasting) मोठ्या प्रमाणावर होतो. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर असे अनेक पदार्थ (Quick farali rasmalai using sabudana) करुन खाल्ले जातात. परंतु उपवास असला की शक्यतो आपल्या खाण्यावर बंधन येते, आपण सगळेच पदार्थ न खाता काही मोजकेच पदार्थ उपवासाला खाऊ शकतो. अशा परिस्थितीत, साबुदाण्याचे तेच ते नेहमीचे पदार्थ खाऊन काहीवेळा तर आपल्याला चक्क कंटाळा येतो(Upvasachi Sabudanyachi Rasmalai).
उपवास केल्यावर काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं आणि सणवार आहे म्हटल्यावर गोडाधोडाचे पदार्थ खाण्याची इच्छा तर होतेच. यासाठीच, आपण साबुदाण्याचीच अगदी कमी साहित्यात व झटपट होणारी गोड रसमलाई करु शकतो. घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या काही मोजक्याच उपवासांच्या पदार्थांनी आपण विकतसारखी रसमलाई करु शकतो. आत्तापर्यंत उपवासाला (How to make Sabudana Rasmalai) आपण साबुदाण्याचे अनेक पदार्थ खाल्ले असतीलच पण यंदा उपवासाची रसमलाई नक्की करुन पाहा. साबुदाण्याची रसमलाई म्हणजे उपवासासाठी पोटभरीचा आणि जिभेचे चोचले पुरवरणा एक परफेक्ट पदार्थ आहे. उपवासाला साबुदाण्याची रसमलाई कशी करायची ते पाहा....
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप (पाण्यांत भिजवलेला)
२. मिल्क पावडर - १ कप
३. साखर - १ कप
४. दूध - २ ते ३ कप
५. केशर काड्या - ५ ते ६ काड्या
६. तेल - २ ते ३ टेबलस्पून
ढाब्यावर मिळते तशी चमचमीत लसूणी मेथी घरी करण्याची पाहा रेसिपी, भाजी-भाकरी आषाढ स्पेशल बेत...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात साबुदाणा घेऊन तो ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
२. त्यानंतर या साबुदाण्यात पाणी घालून ५ ते ६ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवून द्यावा.
३. साबुदाणा पाण्यांत भिजवून घेतल्यानंतर तो थोडा हाताने दाबून मॅश करून घ्यावा त्यानंतर यात मिल्क पावडर व चवीनुसार साखर घालावी. आता हे मिश्रण कालवून एकजीव करुन घ्यावे. तयार मिश्रण आपण हाताने दाबून मळून घ्यावे. मग हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे गोलाकार छोटे गोळे करुन घ्यावे.
४. आता एका भांड्यात दूध ओतून ते व्यवस्थित २ ते ३ उकळ्या येईपर्यंत गॅसच्या मंद आचेवर उकळवून घ्यावे.
५. उकळवून घेतलेल्या दुधात केशराच्या काड्या व चवीनुसार साखर घालावी. आता हलकेच हलवून घेऊन दुधात साखर संपूर्णपणे विरघळवून घ्यावी.
Traditional Food :मुसळधार पावसात गरमागरम वाफाळत्या चहासोबत बिस्किट नको खा पारंपरिक मुगाची मठरी!
६. मग दुधाला मंद आचेवर ठेवून पुन्हा एका उकळी काढावी. सगळ्यात शेवटी या गरम दुधात तयार मिश्रणाचे गोळे सोडावेत आणि २ ते ३ मिनिटे मंद आचेवर गरम करावे.
७. सगळ्यांत शेवटी बाऊलमध्ये सर्व्ह करताना उपवासाची रसमलाई ओतून वरुन आवडत्या ड्रायफ्रुट्सचे काप आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या भुरभुरवून घालाव्यात.
उपवास स्पेशल साबुदाण्याची रसमलई खाण्यासाठी तयार आहे.