श्रावण सुरु झाला की वातावरणात बदल पाहायला मिळतो.(Shravan special) हलक्या पावसाच्या सरी, भक्तीमय वातावरण आणि स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थांचे आस्वाद चाखायला मिळतात.(shravan fast food) श्रावणात अनेक सण- उत्सव असतात. श्रावणी सोमवार, मंगळागौर, श्रावणी शनिवार यांसारख्या दिवशी उपवास केला जातो. उपवास म्हटलं की साबुदाणा, भगर , राजगिरासारखे पदार्थ हमखास खाल्ले जातात.(Upvasache ladoo) साबुदाणा खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, पोटही फुगते.(sweet recipe)
उपवासाच्या दिवशी साबुदाणाव्यतिरिक्त आपण राजगिरा, भगर, वरई देखील खाऊ शकतो. यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो. इतकेच नाही तर ते पचायला हलके देखील असतात. उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे मग पचायला हलके दाणेदार उपवासाचे लाडू करुन पाहा, आठवडाभर टिकतील. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
वरई - १/२ कप
राजगिरा - १/४ कप
शेंगदाणे - १/४ कप
दूध - १/२ कप
तूप - २ चमचे
वेलची पूड - १ चमचा
गूळ - १/२ कप
साहित्य
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई, राजगिरा आणि शेंगदाणे वाटून त्याची पावडर तयार करा.
2. आता दूध गरम करुन थंड कोमट झाल्यावर तयार पावडरमध्ये घालून त्याचे पीठ मळून घ्या. पीठाची जाडसर चपाती लाटून त्याला तूप लावून दोन्ही बाजून व्यवस्थित भाजून घ्या. चपात्या थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करा.
3. बारीक तुकडे केल्यानंतर मिक्सरमध्ये याची पावडर करा. त्यात वेलची पूड घाला. पावडर झाल्यानंतर त्यात चिरलेला गूळ घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
4. पीठ व्यवस्थित तयार झाल्यानंतर लाडू वळवा. पचायला हलके दाणेदार लाडू जास्त वेळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.