Join us

Shravan Special: भरपूर एनर्जी देणारे-प्रोटीन असलेले दाण्याचे लाडू करा १० मिनिटांत, महिनाभरही टिकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 09:35 IST

Peanut laddu recipe: High protein laddu: Shravan fasting sweets: अवघ्या १० मिनिटांत होणारा दाण्याचा लाडू कसा करायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.

श्रावणात अनेकजण उपवास करतात. या महिन्यात अनेकजण सोमवार, गुरुवार, शनिवार किंवा प्रत्येक दिवशी उपवास करतात.(Shravan Food) दिवसभर काही न खाता रात्री किंवा दुपारी उपवास सोडला जातो. या काळात घरात भक्तीमय वातावरण असते.(Shravan Special Ladoo) उपवासं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कायम नाचत असतो. पण रोज किंवा आठवड्यातून दोनदा साबूदाणा खाणं आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे अपचन, पित्त आणि पोट फुगण्याची शक्यता अधिक असते. (High protein laddu)उपवासाच्या दिवशी आपल्याला हलके-फुलके पदार्थ खायला आवडतात.(Peanut laddu recipe) अशावेळी आपण दाण्याचे लाडू बनवून खाऊ शकतो. शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात. शरीरातील रक्त वाढते.(High-Protein Energy-Boosting Peanut Laddus) यात असणारे घटक शरीरातील कॅल्शियम वाढवतात. जर आपल्याला भूक लागली असेल तर अवघ्या १० मिनिटांत होणारा दाण्याचा लाडू कसा करायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया. श्रावण स्पेशल: साबुदाणा अजिबात न वापरता करा पचायला हलके उपवासाचे मऊसूत लाडू, आठवडाभर टिकतील

साहित्य

शेंगदाणे - १ वाटीगूळ - ३/४ वाटी तूप - १ चमचा 

 

कृती 

1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यावर शेंगदाणे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर त्याची सालं काढून घ्या. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि गूळ घालून त्याची पावडर तयार करा. गूळ घातल्यामुळे मिक्सरमध्ये याचा गोळा तयार होईल. 

3. तयार गोळा प्लेटमध्ये काढून घ्या. आपल्याला हवं असल्यास आपण वेलची पूड घालू शकतो. हाताला तूप लावून या पीठाचे छोटे गोळे घेऊन लाडू वळवून घ्या. भूक लागेल तेव्हा खा. 

4. हे लाडू पचायला हलके आणि भरपूर एनर्जी देणारे आहेत. उपवासाच्या वेळी भूक लागत असेल तर दाण्याचे लाडू खाऊ शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थ