Lokmat Sakhi >Food > श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

Shravan Special Food : Dalimbi Bhaat : Valachi Khichadi recipe : How To Make Dalimbi Bhat : maharashtrian dalimbi bhat : traditional dalimbi bhat : श्रावणात प्रत्येक घरोघरी केला जाणारा डाळिंबी भात म्हणजे अस्सल पारंपरिक चवीची मेजवानीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 12:55 IST2025-07-26T12:41:56+5:302025-07-26T12:55:22+5:30

Shravan Special Food : Dalimbi Bhaat : Valachi Khichadi recipe : How To Make Dalimbi Bhat : maharashtrian dalimbi bhat : traditional dalimbi bhat : श्रावणात प्रत्येक घरोघरी केला जाणारा डाळिंबी भात म्हणजे अस्सल पारंपरिक चवीची मेजवानीच...

Shravan Special Food Dalimbi Bhaat How To Make Dalimbi Bhat maharashtrian dalimbi bhat traditional dalimbi bhat | श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. श्रावणात आपण वेगवेगळे सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतो. या सणावारांच्या दिवसांत आपल्यापैकी (Shravan Special Food) बऱ्याचजणांचे उपवास (Dalimbi Bhaat) असतात. उपवास आणि सणवार एकदमच असल्यास आपल्याकडे जेवणाचे मस्त बेत आखले जातात. जेवणातही सात्त्विक, पचनास हलके आणि पौष्टिक आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पदार्थ असतातच(How To Make Dalimbi Bhat).

उपवास, पूजा आणि सण असताना घरोघर जेवणात पारंपरिक चव जपली जाते. अशाच पारंपरिक पण हटके चव असलेल्या पदार्थांपैकी एक खास पदार्थ म्हणजे डाळिंबी भात. मस्त (maharashtrian dalimbi bhat) झणझणीत चवीचा, मसालेदार, पचनास हलका, पारंपरिक असा डाळिंबी भात म्हणजेच श्रावणातील उपवास व नैवेद्याच्या ताटातील खास पदार्थ. अगदीच कमी साहित्यात झटपट होणारा तसेच घरांतील प्रत्येकाला आवडणारा श्रावणातील खास भाताचा प्रकार कसा करायचा याची साधीसुधी रेसिपी पाहूयात( traditional dalimbi bhat).

साहित्य :-

१. वाल - १ कप (मोड आलेले)
२. बासमती तांदूळ - २ कप (३० मिनिटे पाण्यांत भिजवून घेतलेले)
३. तेल - ३ टेबलस्पून 
४. मोहरी - १/२ टेबलस्पून 
५. जिरे - १/२ टेबलस्पून
६. हिंग - १/२ टेबलस्पून 
७. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
८. आलं - लसूण - कोथिंबीर पेस्ट - १ टेबलस्पून 
९. मालवणी मसाला - १ टेबलस्पून 
१०. हळद - १/२ टेबलस्पून
११. धणेपूड - १ टेबलस्पून 
१२. जिरेपूड - १ टेबलस्पून  
१३. नारळाचे दूध - १ कप  
१४. गरम पाणी - ३ कप 
१५. मीठ - चवीनुसार 
१६. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून  
१७. साजूक तूप - १ टेबलस्पून 

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...


श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा तेलात खमंग परतल्यानंतर त्यात आलं - लसूण - कोथिंबीरची पेस्ट घालावी. 
२. या सगळ्यात मिश्रणात मग मालवणी मसाला, हळद, धणेपूड, जिरेपूड घालावी. अशाप्रकारे खमंग मसाला तयार करुन मग त्यात मोड आलेले वाल घालावेत. या तयार खमंग फोडणीत २ ते ३ मिनिटे वाल चांगले परतवून घ्यावेत. 

३. मग पाण्यांत भिजवलेला बासमती तांदूळ घालावा. त्यानंतर त्यात नारळाचे दूध, गरम पाणी, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी. झाकण ठेवू हा भात १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावा. 
४. भात व्यवस्थित शिजल्यानंतर त्यावर थोडे साजूक तूप सोडावे. 

डाळिंबी भात खाण्यासाठी तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर व ओलं किसलेलं खोबरं भुरभुरवून भात खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: Shravan Special Food Dalimbi Bhaat How To Make Dalimbi Bhat maharashtrian dalimbi bhat traditional dalimbi bhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.