श्रावण महिन्यातील उपवास हे इतर दिवशीच्या उपवासांपेक्षा थोडे खासच असतात. श्रावणातील उपवासाला घरात वेगवेगळ्या उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच काहीतरी चविष्ट आणि पोटभरीचं असं खायला हवं असतं. उपवासांच्या पदार्थांमध्ये आपण बरेचदा (Shravan Fasting Special Medu Vada Upvasacha Medu Vada Recipe) साबुदाण्याची खिचडी, वडे, भगरीचा भात, साबुदाण्याची खीर असे काही नेहमीचे ठरलेले आणि करायला सोपे असेच पदार्थ खातो. परंतु बरेचदा हे पदार्थ खाऊन (how to make medu vada for fast) कंटाळा येतो. अशावेळी, नेहमीच्या साबुदाण्याच्या खिचडीला किंवा वड्यांना पर्याय म्हणून काहीतरी वेगळं खायचं असेल तर उपवासाचे कुरकुरीत मेदू वडे हा एक उत्तम (Upvasacha Medu Vada Recipe) पर्याय आहे. हे मेदू वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात, जे खायला अधिकच चविष्ट लागतात(fasting medu vada recipe).
भगर, शेंगदाण्याचा कूट, उकडलेला बटाटा असे काही मोजकेच उपवासाला चालणाऱ्या पदार्थाचा वापर करून तयार केलेले वडे हलके - फुलके, कुरकुरीत आणि चवीलाही अप्रतिम लागतात. विशेषतः नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे वडे खाल्ल्यास त्यांची चव आणखी वाढते. उपवासासाठी कुरकुरीत आणि स्वादिष्ट मेदू वडे कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. पाणी - १ + १/२ कप
२. मीठ - चवीनुसार
३. साखर - १/२ टेबलस्पून
४. भगर - १ कप (स्वच्छ धुवून पाण्यांत भिजवलेली)
५. हिरव्या मिरच्या - आलं - जिरे यांची एकत्रित पेस्ट - १ टेबलस्पून
६. दही - ३ टेबलस्पून
७. बटाटे - २ (उकडवून मॅश केलेलं)
८. शेंगदाण्याचा कूट - २ टेबलस्पून
९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१०. तेल - तळण्यासाठी
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये भगर घेऊन ती स्वच्छ धुवून पाण्यात १० ते १५ मिनिटे व्यवस्थित भिजवून घ्यावी.
२. एका मोठ्या भांडयात पाणी घेऊन ते मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम पाण्यात चवीनुसार मीठ व साखर घालून ते पाण्यात संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. मग त्यात भिजवून घेतलेली भगर घालावी. भगर १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावी.
रक्षाबंधन स्पेशल : दूध आटवून तासाभरात करा भावासाठी खास मलई लाडू, प्रेमाची खास भेट...
फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? ६ टिप्स, एका मिनिटात बर्फ वितळून फ्रिज होईल स्वच्छ...
३. व्यवस्थित शिजवून घेतलेली भगर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. (आपण उरलेल्या भगरीच्या भातापासून देखील हे मेदू वडे तयार करु शकतो.) मग यात हिरव्या मिरच्या - आलं - जिरे यांची एकत्रित पेस्ट, दही, उकडवून मॅश केलेला बटाटा, दाण्याचा कूट, कोथिंबीर (पर्यायी) हे सगळे जिन्नस एकत्रित करून हाताने हलकेच दाब देत पीठ मळून घ्यावे.
४. पीठ मळून झाल्यावर हाताला थोडंस तेल किंवा पाणी लावून पिठाचा गोळा घेत मेदू वडे तयार करून घ्यावेत.
५. एका मोठ्या कढईत तेल व्यवस्थित गरम करून त्यात मेदू वडे सोडून ते खरपूस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
उपवासाचे खरपूस, मस्त कुरकुरीत असे खमंग मेदू वडे खाण्यासाठी तयार आहेत. दही किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत हे वडे खायला अधिकच चविष्ट लागतात.