Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पोटभर जेवण केल्यानंतर लगेच फळं खावीत की नाही? पाहा याबाबत काय सांगतात एक्सपर्ट

पोटभर जेवण केल्यानंतर लगेच फळं खावीत की नाही? पाहा याबाबत काय सांगतात एक्सपर्ट

Fruit Eating Tips : आपण जाणून घेऊया की पोटभर जेवण केल्यावर फळं खावीत की नाही आणि त्याबाबत एक्सपर्ट काय सांगतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:04 IST2026-03-09T11:31:55+5:302026-03-09T12:04:52+5:30

Fruit Eating Tips : आपण जाणून घेऊया की पोटभर जेवण केल्यावर फळं खावीत की नाही आणि त्याबाबत एक्सपर्ट काय सांगतात. 

Should you eat fruits immediately after a heavy meal experts explain | पोटभर जेवण केल्यानंतर लगेच फळं खावीत की नाही? पाहा याबाबत काय सांगतात एक्सपर्ट

पोटभर जेवण केल्यानंतर लगेच फळं खावीत की नाही? पाहा याबाबत काय सांगतात एक्सपर्ट

Fruit Eating Tips : वेगवेगळ्या सीझनमधील वेगवेगळी फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. वेगवेगळ्या फळांची टेस्ट तर आवडणारी असतेच, सोबत त्यांमधून शरीराला अनेक महत्वाची पोषक तत्वही मिळतात. व्हिटामिन, मिनरल्स, फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंट असलेल्या फळांनी शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच अनेक आजारांपासूनही बचाव होतो. उन्हाळ्यात कलिंगड, संत्री किंवा सफरचंद खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि पचन तंत्रही सुधारतं. बरेच लोक जेवण झाल्यावर फळं खातात. पण काही लोकांना प्रश्न असतो की, जेवण केल्यानंतर लगेच फळं खावीत की नाही? अशात आपण जाणून घेऊया की पोटभर जेवण केल्यावर फळं खावीत की नाही आणि त्याबाबत एक्सपर्ट काय सांगतात. 

बरेच लोक पोटभर किंवा जड जेवण केल्यावर फळं मिठाईसारखी खातात. पण एक्सपर्टचं याबाबत असं मत आहे की, असं करणं सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल असं नाही. फळांमध्ये असलेली नॅचरल शुगर आणि फायबर लवकर पचतं. तर जड जेवणातील प्रोटीन आणि फॅट पचायला जास्त वेळ लागतो. अशात जर भरपूर जेवण केल्यावर लगेच फळं खाल्लीत तर पचनक्रिया स्लो होऊ शकते. त्यामुळे काहींना गॅस आणि सूजेची समस्या होऊ शकते. पण सगळ्यांनाच या समस्या होतीलच असं नाही. ज्या लोकांचं पचन तंत्र संवेदनशील असतं किंवा फ्रुक्टोज इन्टॉलरन्स किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या समस्या असतात, त्यांनी जेवणानंतर लगेच फळं खाल्लीत तर त्यांना गॅस किंवा पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते.

दुसरीकडे काही लोकांचं असं मत असतं की, जर फळं जेवणाआधी खाल्लीत किंवा नंतर खाल्लीत तर शरीराला त्यांमधील पोषक तत्व मिळत नाहीत. पण एक्सपर्ट सांगतात की, मानवाचं पचन तंत्र असं बनलं आहे की, ते जेवणातून जास्तीत जास्त पोषक तत्व अॅब्जॉर्ब करतं. खरंतर छोट्या आतडीची लांबी जास्त असते आणि तिचं काम जेवणातील पोषक तत्व हळूहळू अॅब्जॉर्ब करणं असतं. त्यामुळे फळं जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाल्लीत तर त्यांमधील पोषक तत्व नष्ट होत नाहीत.

एक्सपर्टनुसार, काही फळं अशी असतात जी जेवणानंतर पचन व्हायला सोपी असतात आणि पचनात मदतही करतात. यात पपई, अननस, कीवी, बेरिज आणि सफरचंदसारख्या फळांचा समावेश असतो. पपई आणि अननसातील एझांइम्स प्रोटीन तोडण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया चांगली होऊ शकते.

Web Title : भोजन के बाद फल खाना: अच्छा या बुरा? विशेषज्ञ बताते हैं।

Web Summary : भोजन के बाद फल खाने से पाचन प्रभावित हो सकता है। विशेषज्ञों का कहना है कि फल प्रोटीन और वसा की तुलना में तेजी से पचते हैं। कुछ लोगों को गैस या सूजन का अनुभव हो सकता है, खासकर संवेदनशील पाचन के साथ। भोजन से पहले या बाद में खाए गए फल अभी भी पोषक तत्व प्रदान करते हैं। पपीता और अनानास पाचन में सहायता करते हैं।

Web Title : Eating fruit after meals: Good or bad? Experts explain.

Web Summary : Eating fruit after meals can affect digestion. Experts say fruits digest faster than proteins and fats. Some may experience gas or bloating, especially with sensitive digestion. Fruits eaten before or after meals still provide nutrients. Papaya and pineapple aid digestion.