Fruit After Meal Good or Bad : आपलं रोजचं जेवण आणि वेगवेगळी फळं आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. घरी असो किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये बरेच लोक जेवणासोबत फळंही खातात. हल्ली लग्नाच्या जेवणात किंवा हॉटेल्समध्ये जेवणासोबतच फळंही दिली जातात. लोकही कशाचा विचार न करता जेवणासोबत फळं खातात. पण जेवण आणि फळं एकत्र फायदेशीर असतात का? आपण पाहिलं असेल की, हॉटेल किंवा एखाद्या कार्यक्रमात सर्व्ह केली जाणारी फळं ही थंड असतात आणि अनेकदा हे स्टोरेजमधून काढून दिले जातात. अशी फळं आरोग्याचं नुकसान करतात, कसं ते पाहूयात.
जेवणासोबत फळं का खाऊ नये?
आयुर्वेदानुसार शिजवलेलं अन्न जसे की, डाळी, चपाती, भात इत्यादी गोष्टी पचन होण्यास बराच वेळ लागतो. तर फळं मुलायम आणि वेगवेगळ्या तत्वांनी भरलेले असतात त्यामुळे ते अन्नापेक्षा पचनास जास्त वेळ घेतात. त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचा आहार पचन होण्याऐवजी सडू लागतो. त्यामुळे शरीला पूर्ण पोषण मिळत नाही. अशात गॅस, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा आणि आंबट ढेकरी अशा समस्या होतात. तसेच शरीरात विषारी तत्वही जास्त जमा होतात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.
फळे आणि जेवण या दोन्हींचे पूर्ण पोषण ते वेगवेगळ्या वेळी खाल्ले तरच मिळतं. फळे आणि नियमित जेवण हे दोन्ही शुद्ध आहार मानले जातात. त्यामुळे त्यांचं सेवन वेगवेगळ्या वेळी करणं अधिक योग्य ठरतं. आयुर्वेदानुसार अन्न हे फक्त चवीसाठी नसून एक विज्ञान आहे. यात वेळ, प्रमाण आणि अन्नाचे योग्य संयोजन या तिन्ही गोष्टींना समान महत्त्व दिले जाते.
फळे खाण्याची योग्य वेळ
फळे खाण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ हा सर्वात चांगला वेळ मानला जातो. सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ शकता, पण त्या वेळी आंबट फळे टाळावीत. कारण आंबट फळांमुळे गॅस आणि पोटात जळजळ होऊ शकते. संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वीही फळे खाऊ शकता.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की फळे दूध किंवा दह्यासोबत खाऊ नयेत. आयुर्वेदात याला विरुद्ध आहार मानले जाते. तसेच फळे खाल्ल्यानंतर किमान 1 तास जेवण करू नये. फळे पचल्यावरच पुढचे जेवण करणे अधिक योग्य मानले जाते.
Web Summary : Eating fruits with meals can cause digestive issues, according to Ayurveda. Fruits digest faster than cooked food, leading to fermentation and gas. Consume fruits separately, ideally in the morning or evening, avoiding dairy combinations.
Web Summary : आयुर्वेद के अनुसार, भोजन के साथ फल खाने से पाचन संबंधी समस्याएं हो सकती हैं। फल पके हुए भोजन की तुलना में तेजी से पचते हैं, जिससे किण्वन और गैस होती है। डेयरी संयोजनों से बचते हुए, फलों का अलग से, सुबह या शाम को सेवन करें।