Clove In Summer : हिवाळ्यात गरम तत्व असलेल्या गोष्टींचा अधिक वापर केला जातो. कारण यांच्या मदतीनं शरीर आतून थंड ठेवण्यास, सर्दी-खोकला रोखण्यास मदत मिळते. यात सगळ्यात वरच्या क्रमांकावर असते लवंग. हिवाळ्यात लवंगचा वापर भरपूर केला जातो. चहा असो वा वेगवेगळे पदार्थ किंवा अशीच खाणं असो लवंग भरपूर खाल्ली जाते. मात्र, अनेकांना असा प्रश्न पडतो की, लवंग उन्हाळ्यात खावी की नाही? कारण तर ती गरम असते. अशात अनेक एक्सपर्ट सांगतात की, उन्हाळ्यातही लवंग खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. फक्त प्रमाण आणि पद्धत योग्य असली पाहिजे.
काय सांगतो रिसर्च?
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लवंगमधील यूजेनॉल तत्व बॅक्टेरिया आणि वायरसला नष्ट करण्यास मदत करतं. ज्यामुळे उन्हाळ्यात फूड पॉयजनिंग आणि घशाच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. यातील अनेक अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-व्हायरल गुण आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीनं फायदेशीर असतात.
पचन सुधारतं, तोंडाची दुर्गंधी जाते
उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे पचनक्रिया अनेकदा बिघडते. अशात लवंग गॅस, अपचन आणि पोटदुखीपासून आराम देण्यास मदत करते. इतकंच नाही तर शरीरात पाणी कमी झाल्यावर तोंड कोरडं पडतं. अशात तोंडातून येणारी दुर्गंधी सुद्धा लवंग दूर करते.
उन्हाळ्यात लवंगचे फायदे
लवंगमध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात. जे शरीराला आतून सुरक्षित ठेवतात. तसेच यानं हिट रॅशेज आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
डोकेदुखी आणि थकवा दूर होईल
तापमान वाढल्यामुळं या दिवसांमध्ये डोकेदुखीची समस्या खूप वाढते. अशात लवंगच्या तेलाचा सुगंध घेणं किंवा कपाळावर थोडं लावणं फायदेशीर ठरेल.
उन्हाळ्यात कशी खाल लवंग?
उन्हाळ्यात लवंग एक किंवा दोन खाणं भरपूर होईल. थेट खाण्याऐवजी तुम्ही याचं पाणीही पिऊ शकता. इतकंच नाही तर भाजीच्या तडक्यातही लवंग टाकू शकता. सकाळी एक ग्लास पाण्यात दोन लवंग भिजवून ठेवा आणि हे पाणी सकाळी पिऊन घ्या. जास्त प्रमाणात लवंग खाल तर पोटात जळजळ, जुलाब किंवा स्किन इरिटेशनची समस्या होऊ शकते.
त्वचेसाठी लवंग
लवंगाचं तेल कोरफडीच्या गरात मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. यानं पिंपल्स आणि रॅशेज दूर होतील.