Join us

Shiv Jayanti 2025: खास मराठमोळी परंपरा असलेली सांज्याची पोळी, मऊमुलायम गोड परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 15:28 IST

Shiv Jayanti 2025 Celebration: Shiv Jayanti special recipe: shiv Jayanti special food: sanjechi poli: food: sanjechi poli recipe: how to make sanjechi poli: Shivaji maharaj Jayanti: Traditional food: शिवजयंतीला खास मराठमोळी रेसिपी बनवण्याचा विचार करत असाल तर सांज्याची पोळी ट्राय करु शकता.

१९ फेब्रुवारीला सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाते. या दिवसानिमित्त आपण महाराजांचे पूजन आणि अभिवादन करतो. प्रत्येक शिवप्रेमी महाराजांसमोर नतमस्क होतो. (Shiv Jayanti special recipe) प्रत्येकाच्या मनात महाराजांविषयी आदर आणि आपुलकी पाहायला मिळते. शिवजयंती साजरा करताना आजही काही खास गोष्टी केल्या जातात. रायगडावर बाळ राजेंचा पाळणा बनवून तो झुलवला जातो. राजांचा मूर्तीचा अभिषेक केला जातो. तर परंपरेनुसार महाराजांच्या काळातील काही खास आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. (sanjechi poli)

या दिवसानिमित्त पठाणी पुलाव किंवा भाजी-फुलके या पदार्थांची देखील चव चाखायला मिळते. (how to make sanjechi poli)शिवाजी महाराजांच्या काळातील विशेष पदार्थांट्या चवीला अनुभवण्याची ही एक उत्तम संधीच आहे. जर तुम्ही देखील यंदाच्या शिवजयंतीला खास मराठमोळी रेसिपी बनवण्याचा विचार करत असाल तर सांज्याची पोळी ट्राय करु शकता. चवीला गोड आणि मऊसुत बनेल, पाहूया रेसिपी

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे? नक्की ट्राय करुन पाहा बाजरीचे सूप, पौष्टिक आणि चविष्ट

साहित्य गव्हाचे पीठ -१ वाटी मीठ - चवीनुसार तुप - १ वाटी रवा - १ कप गूळ - १ कप पाणी - १ १/२ कप वेलची आणि जायफळ पावडर - चवीनुसार 

View this post on Instagram

A post shared by Shweta Bhavsar (@swast_ani_mast_recipes)

">

कृती 

  • सर्वात आधी गव्हाचे कणीक मळून घ्या. मळून झाल्यानंतर १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. 
  • यानंतर कढईमध्ये पाणी घालून त्यात किसलेला गूळ घाला. त्यात वरुन चमचाभर तूप आणि वेलची-जायफळ पावडर घाला. 
  • त्यामध्ये रवा घालून मिश्रण चांगले शिजवून घ्या. तयार मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर त्याचे गोळ बनवून घ्या 
  • मळलेल्या कणकाचे गोळे करुन त्यात रव्याच्या सारणाचे गोळे भरा. पोळ्यांसारखी चपाती लाटून तव्यावर भाजून घ्या. 
  • यावर वरुन तूप लावा. तयार होईल साजूक तुपातली खास मराठमोठी सांज्याची पोळी... 
टॅग्स :अन्नपाककृतीशिवजयंतीमहाराष्ट्र