Join us

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी करा खास शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 17:32 IST

Shingada Ladoo : Fasting Farali lado : Upwas Ladu : Ashadhi Ekadashi Upavas Special Shingada Pithache Ladu : उपवासाच्या दिवशी काहीतरी झटपट, चविष्ट व पौष्टिक खायचं असेल तर शिंगाड्याच्या पिठाचे लाडू उत्तम पर्याय आहे.

उपवास म्हटलं की खाण्यापिण्यावर मर्यादा येतात. उपवासाला आपण मोजकेच पदार्थ खाऊ शकतो यामुळे, शरीराला ऊर्जा देणारे आणि पोटभरीचे पदार्थ (Shingada Ladoo) खाणे गरजेचे असते. उपवासाला खाता येतील असे पदार्थ म्हटले तर, बटाटा आणि साबुदाणा या दोन पदार्थांवरच आपण जास्त भर देतो. परंतु उपवासाच्या (Fasting Farali lado) दिवशी सतत बटाटा आणि साबुदाण्याचे तेच ते वडे, खिचडी खाऊन कंटाळा येतो. इतकेच नाही तर यामुळे पोट बिघडण्याची शक्यता (Upwas Ladu) असते. यासाठीच, उपवासाच्या दिवशी काहीतरी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ खायचा असेल तर आपण शिंगाड्याच्या पिठाचे लाडू करु शकतो(Ashadhi Ekadashi Upavas Special Shingada Pithache Ladu).

उपवासाला शिंगाड्याच्या पिठाचे लाडू केल्यास त्यातून मिळणारे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात. याचबरोबर, शिंगाडयांच्या पिठात मिनरल्स, फायबर आणि इतरही पौष्टिक घटक असतात,जे  उपवासात थकवा येऊ न देता दिवसभर ताजेतवाने ठेवतात. उपवासाच्या दिवशी काहीतरी झटपट, चविष्ट आणि पौष्टिक खायचं असेल तर शिंगाड्याच्या पिठाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. उपवासाचा दिवस खास करायचा असेल, तर शिंगाड्याच्या पिठाचे लाडू नक्की करून बघाच!   

साहित्य :- 

१. साजूक तूप - ४ ते ५ टेबलस्पून २. शिंगाड्याचे पीठ - ५ ते ६ टेबलस्पून ३. शेंगदाण्याचा कूट - १ कप ४. पिठीसाखर - १ कप 

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

अस्सल गावरानं चवीचं पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचं पिठलं! पारंपरिक मराठमोळी झक्कास झटपट रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी कढई व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात साजूक तूप घालून ते व्यवस्थित वितळवून घ्यावे. २. साजूक तूप संपूर्णपणे वितळल्यावर त्यात शिंगाड्याचे पीठ घालावे. ३. साजूक तूप आणि शिंगाड्याचे पीठ एकत्रित कालवून तुपात खरपूस आणि खमंग असा सुगंध येईपर्यंत पीठ चांगले भाजून घ्यावे. ४. साजूक तुपात शिंगाड्याचे पीठ व्यवस्थित भाजून त्याचे थोडे लपथपी आणि रसरशीत असे मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात शेंगदाण्याचा कूट घालावा.   

कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...

५. आता एका मोठ्या परातीत पिठीसाखर घेऊन त्याच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. या पिठीसाखरेत कढईतील भाजून घेतलेले शिंगाड्याचे पीठ ओतून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे सगळे मिश्रण मळून घ्यावे.  ६. तयार मिश्रणाचे गोलाकार लाडू वळून घ्यावेत. 

उपवासाला खाता येतील असे शिंगाड्याच्या पिठाचे झटपट होणारे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीआषाढी एकादशी २०२५