Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > लहान मुलांसाठी पावसाळी खाऊ 'शेजवान रोल' कुरकुरीत चमचमीत आणि खमंग पदार्थ

लहान मुलांसाठी पावसाळी खाऊ 'शेजवान रोल' कुरकुरीत चमचमीत आणि खमंग पदार्थ

'Shejwan Roll' a crunchy and delicious monsoon food for kids : डब्यासाठी खाऊ. मस्त चमचमीत शेजवान रोल करा झटपट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 11:59 IST2025-06-08T11:58:21+5:302025-06-08T11:59:59+5:30

'Shejwan Roll' a crunchy and delicious monsoon food for kids : डब्यासाठी खाऊ. मस्त चमचमीत शेजवान रोल करा झटपट.

'Shejwan Roll' a crunchy and delicious monsoon food for kids | लहान मुलांसाठी पावसाळी खाऊ 'शेजवान रोल' कुरकुरीत चमचमीत आणि खमंग पदार्थ

लहान मुलांसाठी पावसाळी खाऊ 'शेजवान रोल' कुरकुरीत चमचमीत आणि खमंग पदार्थ

शेजवान रोल हा पदार्थ लहान मुलांना नक्कीच आवडेल. पावसाळ्यात गरमागरम रोल खायला सगळ्यांनाच मज्जा येईल. ('Shejwan Roll' a crunchy and delicious monsoon food for kids)करायला अगदी सोपा आहे. ही रेसिपी करण्यासाठी काय कराल वाचा. 

साहित्य
तेल, हिरवी मिरची, शेजवान चटणी, आलं, लसूण, बटाटा, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, कांदा, पोळी, चीज, बटर, मेओनिज 

कृती
१. हिरवी मिरची अगदी बारीक चिरुन घ्यायची. तसेच लसणाच्या काही पाकळ्या किसून घ्यायच्या. आल्याचा तुकडा किसून घ्यायचा. कांदा बारीक चिरुन घ्यायचा. चीज किसून ठेवायचे. 

२. एका कुकरमध्ये थोडे बटाटा उकडत ठेवायचे. बटाटे छान उकडल्यावर काढून घ्यायचे गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर बटाटा सोलायचे. बटाटा व्यवस्थित कुसकरुन घ्यायचा. कुसकरलेला बटाटा बाजूला ठेवायचा. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लसणाच्या किसलेल्या पाकळ्या घालायच्या. किसलेले आले घालायचे आणि जरा छान खमंग परतायचे. परतून झाल्यावर त्यात कुसकरलेला बटाटा घालायचा. बटाटा छान परतायचा. 

४. मग त्यात चमचाभर लाल तिखट घालायचे. चमचाभर शेजवान चटणी घालायची. शेजवान चटणी फार तिखट असते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार त्या चटणीचा वापर करा. चटणी बटाट्याला छान लागल्यावर त्यात मीठ घालायचे. चटणीतही मीठ असते. त्यामुळे मीठ कितपत लागेल याचा अंदाज घ्या. खारट होणार नाही याची काळजी घ्या.   

५. मिश्रणात आता कांदा घाला. छान बारीक चिरलेला कांदा परतायचा. पूर्ण परतला जाणार नाही फक्त खमंग एकजीव करायचा. कोथिंबीर बारीक चिरायची. मिश्रणात घालायची. सगळं ढवळायचं. घट्ट मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा. बटाट्याचे सारण गार होऊ द्यायचे. 

६. एका पोळीला थोडे मेओनिज लावायचे. पोळीवर पसरवायचे. त्यावर थोडा चिरलेला कांदा घालायचा. तयार केलेले बटाट्याचे सारण लावायचे. लांब आकारात करुन ते लावायचे. पोळीच्या मधोमध पातळ असा लांबट थर लावायचा. त्यावर किसलेले भरपूर चीज टाकायचे. पोळीची गुडाळी करुन घ्यायची. 

७. एका तव्यावर बटर घालायचे. त्यावर थोडे लाल तिखट घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची. तयार रोल त्यावर परतायचा. दोन्ही बाजूंनी कुरकुीरत होऊ द्यायचा.       

 

Web Title: 'Shejwan Roll' a crunchy and delicious monsoon food for kids