lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...

झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...

Shakti kapoor ka Favorite Poha : रोजच्या पोह्याला द्या मटारचा हटके ट्विस्ट, नाश्ता होईल स्पेशल; खाल पोटभर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 11:51 AM2023-12-20T11:51:54+5:302023-12-20T11:58:59+5:30

Shakti kapoor ka Favorite Poha : रोजच्या पोह्याला द्या मटारचा हटके ट्विस्ट, नाश्ता होईल स्पेशल; खाल पोटभर..

Shakti kapoor ka Favorite Poha | झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...

झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...

महाराष्ट्रात नाश्ता म्हटलं की लोकं आवडीने पोहे, उपमा किंवा फोडणीची पोळी करून खातात. काही जण सोमवार ते रविवार आठवड्यातील सातही दिवस आवडीने पोहे खातात. पोहे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोहे अनेक प्रकारचे केले जातात. सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाला पोहे आवडतात. नुकतंच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता शक्ती कपूरला देखील पोहे (Shakti Favourite Pohe) आवडत असल्याचं त्याने म्हटलंय. त्याला पोहे चवीला तिखट आणि झणझणीत लागतात. शिवाय तो पोहे करताना त्यात हिरवे मटार मिक्स करतो.

जर आपल्याला शक्ती कपूर स्पेशल पोहे खाऊन पाहायचं असेल तर, एकदा ही रेसिपी नक्की करून पाहा. हिवाळ्यात मटार स्वस्त दरात मिळतात. शिवाय मटारचा वापर आपण सहसा भाजी किंवा पराठे तयार करण्यासाठी करतो (Cooking Tips). जर आपल्याला पोहे करताना थोडा हटके ट्विस्ट देऊन पाहायचं असेल तर, एकदा मटार पोहे करून पाहा(Shakti kapoor ka Favorite Poha).

मटार पोहे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

कांदा

मोहरी

जिरं

हिरवी मिरची

थंडीत करायलाच हवे टोमॅटो रस्सम, लालबुंद रसरशीत अस्सल रस्समची ही घ्या परफेक्ट रेसिपी

कांदा

मटार

मीठ

हळद

शेंगदाणे

कोथिंबीर

लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम, पोहे भिजवून घ्या. नंतर कढईत ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात उकडून घेतलेले मटार, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर हळद घालून मिक्स करा.

तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही उपयोगी

साहित्य परतवून झाल्यानंतर त्यात भिजवलेले पोहे, तळलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे शक्ती कपूर स्पेशल झणझणीत मटार पोहे खाण्यासाठी रेडी.

Web Title: Shakti kapoor ka Favorite Poha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.