दही वडे आवडतात का? मग ही रेसिपी नक्की पाहा. (See the very easy recipe to make Dahi wada)उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त गोड आंबट तिखट असे दहीवडे खायलाच हवेत.
साहित्यउडदाची डाळ, मूगाची डाळ, पाणी, मीठ, दही, हिंग, हिरवी मिरची, आलं, साखर, कोथिंबीर, पुदिना, चिंच, लाल तिखट, जिरे पूड, काळी मिरी पूड
कृती१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ व्यवस्थित धुऊन घ्या. (See the very easy recipe to make Dahi wada)दोन्ही डाळी सम प्रमाणात वापरायच्या. धुऊन झाल्यावर त्यामध्ये पाणी ओता. डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळ पर्यंत डाळ मस्त भिजलेली असेल.
२. डाळीचे पाणी काढून टाका. डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. हिंग घाला. त्यामध्ये आल्याचा तुकडा हिरव्या मिरचीचे तुकडेही टाका. छान घट्ट अशी पेस्ट करुन घ्या. त्यामध्ये वाटताना थोडे पाणी घाला. डाळ वाटून झाल्यावर एका खोलगट भांड्यामध्ये काढा. त्यामध्ये मीठ टाका. आणि पीठ व्यवस्थित फेटून घ्या. छान एकजीव आणि मऊ झाल्यावर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
३. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यावर त्यामध्ये एक-एक करुन वडे सोडा आणि छान तळून घ्या. सगळे वडे तळून झाल्यावर एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये ते वडे टाका.
४. मस्त गोड दही वापरा. आंबट दही असेल तर पदार्थाला चव चांगली येणार नाही. दही छान फेटून घ्या. मग त्यामध्ये मीठ घाला. लाल तिखट घाला. तसेच साखर घाला. दही जरा गोड करुन घ्या.
५. एका वाटीमध्ये चिंच भिजत घाला. अर्ध्या तासाने चिंच वाटून घ्या. त्यामध्ये थोडा गूळ घातला तर चव आणखी छान येते. चिंचेची पेस्ट एका गाळणीचा वापर करुन गाळून घ्या. चोथा काढून टाका.
४. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आल्याचा तुकडा घाला. तसेच पुदिन्याची पाने घाला. मीठ घाला. सगळं छान वाटून घ्या.
५. एका ताटामध्ये दही घ्या. पाण्यात टाकतलेले वडे काढा आणि पिळा मगच ताटामध्ये घ्या. दह्यावर वडे ठेवल्यावर चिंचेची चटणी हिरवी चटणी त्यावर टाका. तसेच काळी मिरी पूड टाका. लाल तिखट टाका. जिरे पूड टाका. दही वडे करायला अगदीच सोपे आहेत.