Lokmat Sakhi >Food > शाहरुख खानला आवडणारे दिल्लीचे फेमस रामलड्डू करण्याची पाहा रेसिपी, चव आगळी पण खास

शाहरुख खानला आवडणारे दिल्लीचे फेमस रामलड्डू करण्याची पाहा रेसिपी, चव आगळी पण खास

See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special : पावसाळ्यासाठी खास रेसिपी. नाश्त्याला करा मुळीचा पाला घातलेले राम लड्डू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 15:51 IST2025-05-19T15:49:54+5:302025-05-19T15:51:08+5:30

See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special : पावसाळ्यासाठी खास रेसिपी. नाश्त्याला करा मुळीचा पाला घातलेले राम लड्डू.

See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special | शाहरुख खानला आवडणारे दिल्लीचे फेमस रामलड्डू करण्याची पाहा रेसिपी, चव आगळी पण खास

शाहरुख खानला आवडणारे दिल्लीचे फेमस रामलड्डू करण्याची पाहा रेसिपी, चव आगळी पण खास

दिल्लीमध्ये स्ट्रीटफुड फार लोकप्रिय आहे. एक फार लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे राम लड्डू. (See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special)फक्त दिल्लीकरांनाच नाही तर शाहरुख खानलाही हे राम लड्डू फार आवडतात. करायला अगदी सोपा असलेला हा पदार्थ अगदी झटपट करता येतो. भजीचाच प्रकरा आहे मात्र त्यात मुळ्याचा पाला घातलेला असतो. मुळा इतका चविष्ट लागू शकतो यावर विश्वासच बसणार नाही. 

या राम लड्डूंबरोबर एक खास चटणी खायची असते. ती चटणी कशी करायची त्याची साधी रेसिपीही आहे ती ही करा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे दिल्ली स्पेशल राम लड्डू नक्की खा.  

साहित्य
चणा डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, मुळ्याचा पाला, मीठ, आलं, हिरवी मिरची, पाणी, तेल

कृती
१. चणा डाळ वाटीभर घेतली तर, इतर डाळीही वाटीभर घ्यायच्या. वाटीभर चणाडाळ एका खोलगट पातेल्यात घ्यायची. त्यात वाटीभर उडदाची डाळ घालायची. (See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special)तसेच त्यात मूग डाळ घालायची. सगळ्या डाळी एकत्र करुन छान धुवायच्या. दोन ते तीन पाण्यातून काढल्यानंतर डाळ रात्रभर भिजत ठेवायची. किमान चार ते पाच तास तरी डाळी भिजल्या पाहिजेत. 

२. भिजलेल्या डाळींचे पाणी काढून टाकायचे आणि जाळी एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. त्यात छान ताजी मुळ्याची पाने घालायची. पाला छान चिरुन घ्या मगच डाळ व पाला एकत्र करा. मिक्सरच्या भांड्यात आल्याचा तुकडा घालायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडे पाणी घालायचे. सगळं एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचे. जास्त पातळ करायचे नाही. जाडंच वाटायचे. 

३. कढईत तेल तापत ठेवायचे.  तेल छान तापल्यावर त्यात लहान-लहान भजी सोडून तळून घ्यायचे. छान कुरकुरीत व खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. 

चटणीसाठी पुदिना घ्यायचा. त्यात आल्याचा तुकडा घालायचा. सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यात कोथिंबीर घालायची. हिरवी मिरची घालायची तसेच गूळ घालायचा. लिंबाचा रस पिळा आणि चटणी वाटून घ्या .त्यात थोडे पाणी घालायचे. आणि मस्त चटणी वाटायची. 
 
४. भजीवर चटणी घातल्यावर त्यावर छान बारीक चिरलेला किंवा पातळ लांब-लांब कापलेला कांदा घालायचा. मुळा घालायचा. कोथिंबीर घालायची. तसेच गाजर घालायचे. गरमागरम राम लाडू अगदी मस्त लागतात.

Web Title: See the recipe for Delhi's famous Ram Laddu, which Shahrukh Khan loves, the taste is unusual but special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.