खाद्यपदार्थांमध्ये आपण विविध मसाले वापरतो. पदार्थाची चव वाढावी यासाठी इतरही काही घटक पदार्थामध्ये घालतो. ( see how to make fragrant Kasuri methi instantly)असाच एक पदार्थ आपण वापरतो तो म्हणजे कसुरी मेथी. या मेथीचा खास वापर मस्त फोडणीचे वरण करताना केला जातो. मेथीचे वरण छान लागतेच मात्र कसुरी मेथीचे वरणही मस्त लागते. या मेथीचा परठाही केला जातो. अगदी झटपट होतो. तसेच चवीलाही मस्त लागतो. शाही पनीर सारख्या रेसिपी करताना त्यामध्ये ही मेथी वापरली जाते. ( see how to make fragrant Kasuri methi instantly)ही फक्त चवीला छान नाही लागत तर पौष्टिकही असते.
कसुरी मेथीचा समावेश आहारात असायला हवा. कारण कसुरी मेथी पचनासाठी चांगली असते. त्यामध्ये फायबर असते. पचन क्रिया चांगली होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कसुरी मेथी फायदेशीर ठरते. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी ही मेथी आहारात घ्यायला हवी. हृदयासाठी हा पदार्थ उपयुक्त असतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीमदत करतो. यामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्वचेसाठी, केसांसाठी ते फायद्याचे ठरतात. कसुरी मेथीमध्ये कॅल्शियम असते हाडांसाठी चांगले ठरते. तसेच आयर्नचेही प्रमाण या मेथीमध्ये जास्त असते. वजन कमी करण्यासाठी कसुरी मेथी उपयुक्त ठरते.
कसुरी मेथी आपण बाजारातून विकत आणतो. मात्र घरी हा पदार्थ तयार करणे अगदीच सोपे आहे. करायला वेळही जास्त लागत नाही तसेच वर्षभर साठवून ठेवता येतो. भाजीमध्ये आमटीमध्ये इतरही पदार्थांमध्ये अगदी दोन चिमटी कसुरी मेथी घातली तरी पुरेशी होते.
कसुरी मेथी करायची कृती अगदीच सोपी आहे.
१. मेथीची छान पाने निवडा. चांगली ताजी जुडी वापरा. काड्या काढून घ्या. फक्त पानाचाच भाग वापरा. पाने वेगळी करुन झाल्यावर पाण्यामध्ये ती पाने बुडवा आणि स्वच्छ धुऊन घ्या. धुऊन झाल्यावर एक कॉटनचा फडका घ्या. तो पसरवा त्यावर मेथीची ओली पाने व्यवस्थित पसरवा आणि पूर्ण सुकी करुन घ्या.
२. शक्य असल्यास तासभर उन्हामध्ये पानं ठेवा. गॅसवर एक कढई तापत ठेवा. कढईमध्ये तेल पाणी काही घालू नका. कढई चांगली तापली की त्यामध्ये मेथीची पाने टाका आणि गॅस बंद करा. गॅस चालू ठेवला तर पाने करपतील. कढई चांगली भरपूर तापणे गरजेचे आहे.
३. काही मिनिटे पाने ढवळा ती एकदम कडक कुरकुरीत होतील. त्याचा भुगा व्हायला लागेल. नंतर ती पाने गार करुन घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.